जिल्हाधिकार जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
शिवशाही वृत्तसेवा, वाई जिल्हा प्रतिनिधी शुभम कोदे.
वाई: महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुट, पाचगणी आणि गुरेगर येथील अनेक अनधिकृत बांधकामे आज सकाळी महसूल विभागाकडून पाडण्यात आली. जिल्हाधिकार जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
पहाटे 5 वाजताच तहसिलदार तेजस्विनी खोचरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारवाईला सुरुवात झाली. वाई प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, वाई तहसीलदार सोनाली मेटकरी, खंडाळा तहसीलदार अजित पाटील, पाचगणी मंडलाधिकारी चंद्रकांत पारवे, महाबळेश्वर मंडलाधिकारी खटावकर यांच्यासह सर्व तलाठी आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून संयुक्त कारवाई करण्यात आली.
गुरेघर येथील प्राची नागपूरवाला आणि उद्यम पंचमढीया यांचे दोन अनधिकृत बंगले जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. तसेच मेटगुट येथील हॉटेल शंभाला देखील पाडण्यात आले.
या मोहिमेमध्ये महाबळेश्वर महसूल विभागाचे शंभरहून अधिक कर्मचारी आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. गुरेघरमधील दोन मोठे बंगले पाडल्याने अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा