मंत्री दानवे सोबत सेल्फी घेण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांची गर्दी
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली - जनशताब्दी रेल्वेच्या शुभारंभ प्रसंगी रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यक्रमात चक्क भाजप कार्यकर्त्यानी भाजपचा झेंडा फडकवीत असताना हा कार्यक्रम रेल्वेच्या केंद्र शासनाचा होता की भाजपचा होता काही कळायला मार्ग नव्हता ,अखेर इतर पक्षातील आलेल्या कार्यकर्त्यांनी झेंडा खाली ठेवा म्हणताच भाजप कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा गुंडाळून ठेवला. रावसाहेब दानवे स्टेज वर येताच सेल्फी घेण्यासाठी कार्यकर्त्यांची रांग लागली होती. सत्कारातच अर्ध्याधिक वेळ गेला.
येथील रेल्वे स्थानक परिसरात शनिवारी जनशताब्दी रेल्वेच्या शुभारंभ कार्यक्रम दुपारी तीन वाजता पार पडणार होता .मात्र हा कार्यक्रम सुमारे दीड तास लेट झाला. यावेळी महायुती सह महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.हा कार्यक्रम केंद्र शासनाचा असताना यात भाजपचा झेंडा फडकायाचा काय उद्देश होता काही कळायला मार्ग नाही, यावेळी रेल्वे प्रशासनाचे अधिकारी असतानाही काही बोलायला तयार नव्हते , केंद्र शासन जरी भाजपचे असले तरी रेल्वे प्रशासन हे सर्व पक्षाचे असताना मूग गिळून घेत होते.
यावेळी खासदार हेमंत पाटील, माजी खासदार हेमंत पाटील , आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे , फुलाजी शिंदे ,बाबाराव बांगर , डॉ. श्रीकांत पाटील आदींची उपस्थिती होती.
दानवे बोलताना पुढे म्हणाले, जनशताब्दी हिंगोलीतून मुंबईला सुरू झाल्याचा आनंद असल्याचे सांगून ,युतीतील नेत्यांत एक वाचत्या नसल्याचे त्यांनी स्पस्ट केले. खासदार पाटील हे नेहमी मुंबई साठी रेल्वे सुरू करण्यासाठी आग्रही भूमिकाही घेत असत.मात्र आमदार मुटकुळे व इतरांनी मला भोकरदन येथे माझी भेट घेऊन हे खासदारांचे काम असल्याचे बोलत असल्याचे सांगत होते यावरून युतीत एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रकार सुरू होते हे स्पस्ट होते.
दानवे पुढे म्हणाले, देशभरात विद्युती करणाचे काम ९८ टक्के पूर्ण झाले असून ,उर्वरित कामे सुरू आहेत. त्यामुळे विद्युतीकरण पूर्ण होताच वंदे भारत रेल्वे सुरू करता येईल असे सांगितले. लातूर येथे वंदे भारत रेल्वेचे कामे युद्धपातळीवर सुरू असून या ट्रेन साठी विद्युतीकरण महत्त्वाचे आहे. दुहेरीकरण साठी बजेट महत्त्वाचे असून मनमाड ते मुदखेड दुहेरीकरण करण्याचे आहे ,त्यासाठी बजेट अपुरे पडत असल्याने मनमाड ते संभाजीनगर एक हजार कोटी लागणार आहेत. राज्यात पंधराशे कोटीची आवश्यकता असताना एक हजार कोटीत कोणती कामे होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यातील १३१८ रेल्वे स्थनाकाची दुरुस्ती केली जाणार असल्याचे सांगून यात हिंगोलीसह अनेक स्थानकाचा समावेश आहे, या स्थानकात कपडे, सह बूट पॉलिश सह अनेक दुकाने राहणार आहेत त्यामुळे सर्व सुविधा एका छताखाली मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.२०४७ पर्यन्त भारत देश जगात सर्वोत्तम राहील याकडे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न असून देशाची अर्थव्यवस्था आजघडीला पाचव्या क्रमांकावर असल्याचे सांगून विकसित देशात भारत अव्वल क्रमांकावर असल्याचे त्यांनी स्पस्ट केले.
यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार तानाजी मुटकुळे , नीती सरकार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दानवे यांनी आता आपल्यासाठी थोडे दिवस शिल्लक राहिले असल्याचे सांगून हास्य उडविले , शेवटी का होईना हिंगोलीकराना मुंबईसाठी रेल्वे उपलब्ध करून दिल्याचे स्पस्ट केले ,त्यानंतर शेवटी हिंगोली मुंबई जनशताब्दी रेल्वे गाडीला रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.
पत्रकार परिषद घेण्याचे टाळलेदरम्यान , नंतर रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या कक्षात पत्रकारांसाठी पत्रकार परिषद असल्याचे सांगून तयारी केली. मात्र परिषेदेकडे दुर्लक्ष करून त्यांनी पत्रकार परिषद ऐवजी भाजपच्या कार्यक्रमाना पसंती देत रवाना झाल्याने पत्रकारात नाराजी पसरल्याचे चित्र होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा