माजी सरपंच दीपक पाटील रुईकर यांची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कूंटुंरकर)
अधिकाराचा गैर वापर करीत नमुना नं. 08 अ मध्ये खाडाखोड करणा-या तत्कालीन ग्रामसेविका एस. के. शिंदे यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून अधिकाराचा गैर वापर केल्याबद्दल त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी माजी सरपंच दीपक पाटील रुईकर यांनी गटविकास अधिकारी यांच्या सह वरिष्ठांकडे केली आहे.
ग्रामपंचायत कायर्यालय, रुई (खु.) ता. नायगाव (खे) जि. नांदेड येथील नमुना नं. ०८ अ मध्य भगवान नारायण जाधव व श्रीनिवास भगवान जाधव यांच्या नावे गावात ग्रा. पं. रेकॉर्डला कुठलीच मालमत्ता नाही. परंतु सन 2016-2017 च्या रजिस्टरमध्ये सिरियलमध्ये 44 नंबर नंतर 44/1 व 44/2 अशो बनावट पेज वरोल नावाने बनवुन त्या रजिस्ट्ररला जोडण्यात आले सन 2016-17 ची नविन झालेली रजिस्टर हे नमुना नं. 08 व 2003 च्या रजिस्टर नुसार तयार करण्यात आले. 2003 चे रजिस्टर हे हस्तलिखीत होतं. व सन 2016-2017 ची रजिस्टर कॉप्युटर देवानागिरी लिपीमध्ये बनविण्यात आलं. दोन्ही रजिस्टरच्या माहिती अधिकारातून साक्षांकित प्रती डिसेंबर 2022 मध्ये तक्रारदार यांनी स्वतः मिळवले आहे. त्यामध्ये पण वरील दोन्ही रजिस्टरमध्ये सदर नावाचे पान नाही. सदर रजिस्टर हे सिरियल नुसार आहे.
फक्त 44 नंबर नंतर 44/1 व 44/2 असे बनावट पेज बनवून 44 नंबर खाली जोडण्यात आले. व दोन्ही पेज बनावट असल्याचे स्पष्टपणे ओळखून येत आहे. त्यामुळे सदर खाडाखोड केलेल्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सदर दोन्ही जोडलेले पेज रद्द करुन संबंधीत तत्कालीन ग्रामसेविका एस. के. शिंदे यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी.अशी मागणी दिपक आनंदराव रुईकर रा. रुई (खु.) ता.नायगाव (खै.) जि. नांदेड यांनी मागणी केली आहे.निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी साहेब, मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब जि.प.नांदेड, ग्रामसेवक साहेब, ग्रामपंचायत कार्यालय, रुई (खु.) याना देण्यात आल्या आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा