विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा होणार गौरव
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
चित्रपट अभिनेते अजय तापकिरे, शिवपानंद शेत्रस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, प्रवीण शिशुपाल फाऊंडेशन, शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या मातोश्री वीरमाता वृंदादेवी गोसावी, आमदार अभिजीत पाटील यांच्या मातोश्री आदर्श माता जयश्री धनंजय पाटील सूर्योदय उद्योगसमूहाचे अनिल इंगवले, ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे, शिवकालीन क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षक अश्विन कडलासकर, प्रयोगशील शेतकरी उद्धव कौलगे, वास्तु व ज्योतिष विद्या अभ्यासक संतोष लवटे, प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. शीतल शहा, इतिहास अभ्यासक व धर्माचरण समुपदेशक सचिन पाटील
लेखक नंदकुमार राऊत, साहित्यिक शिवाजी शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील, निवृत्त प्रशासकीय अधिकारी सुनिल वाळुंजकर, समाज जागृती करणारे "सेवा विठ्ठल चरणांशी" हा लघुपट, इलेक्ट्रिक सायकल बनवणारा संशोधक निखिल जाधव, व्यसनमुक्ती व मराठा आरक्षण चळवळीचे बंडू पवार, प्रसिद्ध हस्तरेषा तज्ञ रेखाकिशोरी टाक, डिजिटल मेडिया पत्रकार इक्बाल शेख, प्रसिद्ध वक्ते आणि समाज जागृती करणारे प्राध्यापक मनोज मोकाशे, आणि युवा पिढीतील पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे अमोल महारनवर, फैजल पठाण, शुभम कोदे, तातेराव बनसोडे, पायल गांधी, यांना हे पुरस्कार जाहीर झाले असून वर्धापन दिन सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना शिवशाही महारत्न पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा