सैनिकाच्या पत्नीचा जागीच मृत्यू
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
जम्मू–काश्मीरमध्ये सेवेत असलेले 3 महार रेजिमेंटचे सैनिक प्रमोद गवई हे रजेवर घरी आले होते. घरी आल्यापासून अवघे दोनच दिवस झाले होते. ते पत्नी कोमल गवई आणि ३ वर्षांच्या मुलासोबत बाईकने मूळ गावी राहेरीकडे जात होते. अपघात दुसरबीड येथील बाभूळवन परिसरात झाला. ट्रकला ओव्हरटेक करताना अचानक बाईकचा तोल गेल्याने तिघेही रस्त्यावर पडले. या दुर्घटनेत कोमल गवई या दुर्दैवाने ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाल्या.
दुर्घटनेनंतर ट्रकचालक वाहन सोडून पळून गेल्याची माहिती मिळाली असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. प्रमोद गवई आणि त्यांचा ३ वर्षांचा मुलगा हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














