आंदोलकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
दिनांक 24 जलै लॉंग मार्च च्या आठव्या दिवशी जवळपास १२५ किलोमीटरचा पल्ला गाठत लॉंग मार्च रावेत या ठिकाणी पोचला आहे. आजही अनेक संघटनांनी आपला पाठिंबा क्रशरविरोधी या लॉन्ग मार्चला दिला. दस्तूर खुद्द शिवसेना (उ.बा.ठा) राज्यसभेचे खासदार श्री संजय राऊत यांनी दूरध्वनीवरून आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला व येणाऱ्या काही दिवसात या विषयावर आपण आपली भूमिका मांडत या तीन गावातील आंदोलनकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. ज्या कुणी शक्ती हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा पडदा फास्ट करण्याचे काम येणाऱ्या काही दिवसात करणार असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले.
त्यामुळे आता हे आंदोलन एका नव्या वळणावर येऊन पोहोचले आहे अनेक आंदोलनकर्त्यांवर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणण्याचे काम सुरू आहे. आंदोलकांची दिशाभूल करत त्यांच्यामध्ये मतभेद सुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आंदोलनकर्त्यांमध्ये एकमेकांप्रती असणारा विश्वास आणि या आंदोलनाच्या दरम्यान त्यांनी एकमेकांसाठी दिलेला त्याग यामुळे आजही आठव्या दिवशी हे आंदोलन व यामधील आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
जोपर्यंत क्रशरचा परवाना रद्द होत नाही तोपर्यंत आपण चालतच राहायचं हा दृढ निश्चय या सर्व मंडळींनी केला आहे. बघता बघता मंत्रालयाच्या दिशेने जाण्याच्या मार्गावरील निम्मा टप्पा पार केला आहे. त्यामुळे आता या सर्व गोष्टीं मागे नक्की कोण आहे याची उत्सुकता आता सर्वांना लागून राहिली आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा