राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे सातारा जिल्ह्यात होणार जंगी स्वागत

प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच येत आहेत सातारा जिल्ह्यात

Newly elected state president of NCP Sharad Chandra Pawar party, MLA Shashikant Shinde, will be given a grand welcome in Satara district, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे शनिवार दि. १९ जुलै रोजी सातारा जिल्ह्यात जंगी स्वागत करण्यात येणार आहे

Newly elected state president of NCP Sharad Chandra Pawar party, MLA Shashikant Shinde, will be given a grand welcome in Satara district, satara, shivshahi news,

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची राज्याची धुरा सातारचे सुपुत्र आमदार शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर सोपविलेली आहे. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यात आगमन करत आहेत. त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. राष्ट्रवादी भवनामध्ये माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी स्वागताच्या नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, सतीश चव्हाण, अरुण माने, संजना जगदाळे, मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील, घनश्याम शिंदे, डॉ. नितीन सावंत, बंडू ढमाळ, सुभाष कारंडे, दिलीप बाबर, संगीता साळुंखे, अर्चना देशमुख, समिंद्रा जाधव, नलिनी जाधव, तेजस्विनी केसरकर, सुरेश पार्ट, दिलीप तुपे, शफिक शेख, सचिन जाधव, विजयराव बोबडे, मकरंद बोडके, मोहनराव शिंदे, गोरखनाथ नलावडे, तेजस शिंदे, साहिल शिंदे, पारिजात दळवी, राजाभाऊ जगदाळे, युवराज पवार, संग्राम कदम, डॉ. निलेश डेरे, विनायकराव बर्गे यांची उपस्थिती होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना माजी मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, आमदार शशिकांत शिंदे यांना पक्षाने संपूर्ण राज्याची जबाबदारी दिलेली आहे. आपल्या सर्व कार्यकर्त्यांना बळ देणारी बाब आहे.

शशिकांत शिंदे साहेबांचे स्वागत  उत्साहात करायचे आहे. मात्र उत्साहाच्या भरात कोणीही पक्षाची शिस्त मोडायची नाही. स्वागतावेळी महामार्गवर कोणीही दुचाकी घेऊन येऊ नये. वाहनांचे कर्णकश हॉर्न टाळायचे आहेत. पक्षाची शिस्त पाळूनच ही रॅली काढण्यात येणार आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे सारोळा पूल शिरवळ येथे सकाळी साडेअकरा वाजता आगमन होणार आहे. या ठिकाणी त्यांचे स्वागत झाल्यानंतर बारा वाजता खंडाळा, सव्वा बारा वाजता वेळे, साडेबारा वाजता कवठे, पावणे एक वाजता भुईंज, एक वाजता पाचवड, एक वाजून पंधरा मिनिटांनी आनेवाडी टोल नाका, दीड वाजता राष्ट्रवादी भवन येथे महिला आघाडीच्या वतीने भव्य त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. तिथून पावणे दोन वाजता पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज, यशवंतराव चव्हाण, किसनवीर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे.

दुपारी दोन वाजता बॉम्बे रेस्टॉरंट येथे स्वागत सोहळा होणार आहे त्यानंतर सव्वा दोन वाजता अजंठा चौक देगाव फाटा, अडीच वाजता अजिंक्यतारा कारखाना वरील स्व. अभयसिंहराजे भोसले पुतळा अभिवादन, पावणेतीन वाजता नागठाणे, तीन वाजता अतित, सव्वातीन वाजता काशीळ, साडेतीन वाजता उंब्रज, पावणेचार वाजता तासवडे टोल नाका, चार वाजता कराड येथील कोल्हापूर नाका येथे महात्मा गांधी, राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर साडेचार वाजता प्रीती संगमावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर बुधवार पेठेतील महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येईल.

सायंकाळी पाच वाजता स्वर्गीय पी डी पाटील साहेब यांच्या मंगळवार पेठेतील निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रॅलीची सांगता होणार आहे.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !