शिवसेनेचा मोर्चाला ठाम पाठिंबा
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
कुसंगाव ग्रामस्थांनी बफर झोन क्षेत्रातील बेकायदेशीर खान व क्रशर बंद करावेत, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या प्रमुख मागण्यांसाठी मुंबईकडे लॉग मार्च सुरू केला आहे. या मोर्चाला दुसऱ्या दिवशी शिवसेना वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा प्रमुख विकास शिंदे यांनी ठाम पाठिंबा जाहीर केला.
त्यांच्यासमवेत मोर्चाचे नेतृत्व करणारे आरपीआयचे युवा नेते स्वप्निल गायकवाड संतोष गायकवाड बाजीगर बागवान व ग्रामस्थांच्या मागण्यांमध्ये "ब्लॉग जेम स्टोन क्रशर व खान परवाने रद्द करावेत", "तात्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, गौण खनिज अधिकारी अमोल थोरात, तहसीलदार सोनाली मिटकरी व निवासी नायब तहसीलदार वैशाली जायगुडे यांना निलंबित करावे", तसेच "बेकायदेशीर पुनर्वसन थांबवावे" यांचा समावेश आहे.
शिवसेना नेते विकास शिंदे म्हणाले, “पश्चिम भागातील नागरिक म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थांच्या पाठीशी आहोत. त्यांच्या न्याय मागण्या मान्य होण्यासाठी शिवसेना नेहमी त्यांच्या सोबत आहे.” या लॉग मोर्चाला शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख रणजित भोसले , शिवसेना सह संपर्कप्रमुख सातारा जिल्हा एकनाथ ओंबळे युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रणव थोरवे वाई तालुका प्रमुख रवींद्र भिलारे तसेच अनेक शिवसैनिकांनी पाठिंबा दिला. या मोर्चाच्या माध्यमातून कुसगाव ग्रामस्थांनी आपली समस्या थेट मंत्रालयापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कानावरती हा सर्व प्रकार घालून संबंधित क्रेशर बंद पाडण्याकरता शिवसेना सर्वतोपरी मदत करणार असून भविष्यात पश्चिम भागात असा कुठलाही प्रकार खपून घेतला जाणार नाही कुठल्याही परिस्थितीत क्रेशर बंद पडणारच विधानसभा प्रमुख शिवसेना विकास शिंदे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा