भाजप प्रवेशानंतर कोल्हापूरला परतणाऱ्या कार्यकर्त्यांचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात - १५ पैकी ५ जण गंभीर जखमी

चंद्रकांतदादा पाटील यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अपघातग्रस्तांशी संवाद व दिलासा

Accident on Mumbai-Pune Expressway, 5 people seriously injured, pune, mumbai, bjp, maharashtra, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर (प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी)

मुंबई-भाजप प्रवेश कार्यक्रम आटोपून कोल्हापूरकडे परतणाऱ्या कार्यकर्त्यांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भातद बोगद्याजवळ झाला. यामध्ये १५ पैकी १० जण किरकोळ जखमी झाले असून ५ जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी वैद्यकीय सेवा यंत्रणा गतिमान केली. व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे अपघातग्रस्तांशी संवाद साधून दिलासा दिला.

हा अपघात भातद बोगद्याच्या पुढे पूर्वी झालेल्या एका वाहन अपघातामुळे झाला. त्या ठिकाणी रस्त्यावर ऑईल सांडलेले होते. त्याचवेळी धुकं असल्याने समोरचं दृश्य स्पष्ट दिसत नव्हतं. चालकाने अचानक ब्रेक घेतल्यामुळे वाहन घसरले व आधी अपघातग्रस्त असलेल्या वाहनावर आदळले.

या अपघातात जखमी झालेल्यांची नावे - 

नियाकत नालबंद, अमजद पठाण, परशुराम हेगडे, किरण पोटभरे, उमर मुल्ला, मेहबूब सय्यद, शिवाजी शिंघे, गुंडा कोळी, रमेश चौगुले, विकास माळवी, अमित येडगुळे, प्रशांत चव्हाण, आतिष आवळे त्यापैकी गुंडा कोळी, रमेश चौगुले, आतिष आवळे, प्रशांत चव्हाण, अमित येडगुळे, विकास माळवी, शिवाजी शिंघे, मेहबूब सय्यद, किरण पोटभरे आणि उमर मुल्ला यांना प्राथमिक उपचारांनंतर डिस्चार्ज देण्यात आला असून उर्वरित जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे.

हा भाजप प्रवेश कार्यक्रम श्री. रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडला होता. या कार्यक्रमात काँग्रेसचे नगरसेवक दिलीप पवार आणि सरस्वती पवार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे माजी नगरसेवक उत्तम कोराने यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.

अपघातानंतर आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांनी तात्काळ मदतीसाठी पावले उचलत एमजीएम रुग्णालयात उपचाराची व्यवस्था केली. श्री. विकास देशमुख आणि श्री. सागर पोवार हे अपघातग्रस्त रुग्णांची सतत काळजी घेत होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली असून सर्वजण सध्या धोक्याच्या बाहेर आहेत.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !