साग, सावर, ऐन इ.प्रजातीची झाडे विनापरवाना तोडली
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
आज रोजी मिळालेल्या गुप्त बातमीवरून मौजे धावडी,ता.वाई येथील शेतकरी ज्ञानदेव नानासाहेब मांढरे यांचे मालकी क्षेत्रात तात्याबा गोविंद मांढरे,रा.धावडी यांचेमार्फत मोहसीन मेहमुद शेख,शहजाद अली,समशेर अली सध्या रा.निगडी,जि.पुणे हे साग,सावर,ऐन इ.प्रजातीची झाडे विनापरवाना तोडून त्यापासुन तयार केलेला लाकुडमाल टाटा कंपनीच्या आयशर टेम्पो क्र.MH-11BL-8879 तसेच मॅसी फर्ग्युसन कंपनीच्या ट्रॅक्टर क्र.MH-14-BM-3551 वाहतुककामी भरून नेत असताना वाई वनविभागाच्या पथकाने धाड टाकुन पकडला
व सुरक्षेच्या कारणास्तव वनक्षेत्रपाल वाई कार्यालयाचे आवारात नेवुन लावला. सदर गुन्हेकामी वनरक्षक वाई यांनी गुन्हा नोंद केला असुन पुढील तपास चालु आहे. सदर कारवाईत एकुण आठ लाख रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई मा.उपवनसंरक्षक सातारा अदिती भारद्वाज मॅडम, सहा.वनसंरक्षक सातारा श्री महेश झांझुर्णे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल वाई सौ स्नेहल मगर मॅडम,वनपाल वाई एस.आर.मोरे, वनरक्षक वाई एस.एस.चौगुले वनपाल व्याहळी एम बी शिंदे, वनरक्षक जांभळी बी.बी.मराडे वनरक्षक भुईंज व्ही एम चौरे व वनरक्षक बेलमाची एच व्ही शिंदे यांनी पार पाडली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा