maharashtra day, workers day, shivshahi news,

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी ऍड.रमेश शिंदे तर सचिवपदी पवन जाधव यांची निवड

 नवनियुक्त कार्यकारिणी पदाधिकार्‍यांचा सत्कार
Public Shiv Jayanti Festival , felicitation of newly appointed executive officers , Hingoli , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली (प्रतिनिधी)- शहरातील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती कार्यकारिणीच्या निवडीसाठी ३१ जानेवारी रोजी बैठक घेण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी ऍड.रमेश शिंदे यांची तर सचिव पदी पवन जाधव पाटील यांची निवड करण्यात आली.
हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात बुधवार दि.३१ जानेवारी रोजी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शक समितीच्या सदस्यांच्या वतीने सर्वानुमते अध्यक्ष म्हणुन ऍड.रमेश शिंदे यांची निवड करण्यात आली. तर सचिव पदी पवन जाधव पाटील यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणुन शिवशंकर घुगे, विलास गोरे, बालाजी वानखेडे, ऍड.स्वप्नील इंगळे यांची निवड करण्यात आली. तसेच सहसचिव सचिन जाधव, सुरज वडकुते तर कोषाध्यक्ष सुमित कांबळे व प्रसिद्धी प्रमुख शिवाजी मेटकर यांची निवड करण्यात आली. यावेळी २०२३ चे सर्व पदाधिकारी, मार्गदर्शक सदस्य यांच्याकडुन नवनियुक्त कार्यकारिणी पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उर्वरित कार्यकारिणी लवकरच गठीत करण्यात येणार आहे. या बैठकीला सर्व जाती धर्मातील शिवप्रेमी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. 

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !