आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांची ग्वाही
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेड राजा येथे विधवा व घटस्फोटीत महिलांचे अनेक प्रश्न समस्या आहेत थोर समाज सुधारक महात्मा फुले यांनी या वर्गासाठी फार मोठे काम केले आहे आम्ही सुद्धा महात्मा फुलेंचा आदर्श घेऊन विधवा व घटस्फोटीत महिलांचे प्रश्न समस्या सोडवण्याचे प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी विधवा व घटस्फोटीत महिलांसाठी डी एस लहाने चांगले काम करीत असल्याबद्दल त्यांचे सुद्धा कौतुक केले. विधवा व घटस्फोटीत महिलांना सुद्धा समाजात सन्मानाने जगता यावे असे सांगितले.
शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही अशा अनेक समस्या त्यांच्यासमोर आहे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात डी एस लहाने सर विधवा व घटस्फोटीत महिलांसाठी मोठे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अँड नाझेर, काझी डॉक्टर, रामप्रसाद शेळके, शिवाजी राजेजाधव, शायनाताई पठाण, स्वातीताई सावजी, प्रतिभाताई भुतेकर, अनिताताई कापरे, पूनम ताई राठोड, कल्याणीताई शिंगणे, मंदाताई शिंगणे, जगनमामा सहाने, विजय तायडे, आदींची उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा