maharashtra day, workers day, shivshahi news,

गोव्यामध्ये सोमवारी रंगणार "प्राइड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड प्रदान सोहळा

महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनतर्फे विविध मान्यवरांचा सलग 21 व्या वर्षी होणार गौरव

Maharashtra journalist award, Wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनतर्फे दिले जाणारे अत्यंत मानाचे असे "प्राइड ऑफ इंडिया -भास्कर अवॉर्ड" येत्या सोमवारी दि. २६ रोजी विविध मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रदान करण्यात येणार आहेत. समाजातील विविध क्षेत्रातील गुणीजनांचा सलग दोन दशकांपासून सातत्याने गुणगौरव होत असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.

गेल्या 21 वर्षांपासून महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना "प्राइड ऑफ इंडिया -भास्कर अवॉर्ड" या पुरस्काराने गौरवण्यात येते. दरवर्षी हा पुरस्कार वितरण सोहळा गोवा राज्याची राजधानी पणजी येथे दिमाखदार स्वरूपात साजरा होत असतो. यंदा पणजीत मीरामार बीच मार्गावरील दीनानाथ मंगेशकर सांस्कृतिक सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. यंदागोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते व गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 26 मे रोजी सकाळी अकरा वाजता हा पुरस्कार वितरण समारंभ होईल. 

त्यावेळी भाजपाचे गोवा राज्य माजी अध्यक्ष खा. सदानंदशेठ तानावडे, पर्यटन मंत्री रोहन कवठे, माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत ,महिला काँग्रेसच्या राज्याध्यक्ष डॉ. प्रतिक्षा खलप, दैनिक तरुण भारतचे आवृत्तीप्रमुख सागर जावडेकर, कोल्हापूरच्या हृदयरोग तज्ञ डॉ. पियू धनवडे, पाचगणीच्या बिली मोरया हायस्कूलच्या संचालिका श्रीमती आदिती गोराडिया, पलूस येथील जनसेवा महिला सोसायटीच्या संस्थापक अर्चनाताई माळी, भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्कचे संस्थापक राजीव लोहार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

श्रीमती आदिती गोराडिया, डॉ. महेश मेनबुदले, शंकरराव मांढरे, सौ. संगीता मुके, रवींद्र उत्तमराव कांबळे, आदर्श धन्वंतरी डॉ. विवेक लोळगे, ठाणे व डॉ.जी.एम. सुतार, सांगली यांच्यासह विशेष सत्कार समारंभासह गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर, खासदार सदानंद शेठ तानावडे, ना. रोहन खवटे, डॉ. प्रतीक्षा खलप, डॉ. पियू धनवडे, कोल्हापूर, डॉ. राजेश्वर विष्णुदास नाईक, डॉ. शुभांगी विजयसिंह देशमुख,  ह.भ.प. नंदकुमार शेटे, सौ. अर्चना संदीप माळी, वसंतशेठ कोठारी, बिपिन तलाठी, दिलीप अहिरे- माथेरान, अलका पाटील, पाचेगाव, सौ. सानिका सावंत,  डॉ. समृद्धी स्वप्निल मेथा,  डॉ. अश्विनी भोईटे,  अनिल सदानंद बामणे, दिलीप आकाराम चौगुले, सौ. अश्विनी अभिजीत गुरव, सौ. सुमन गजानन देसाई, कु. अपूर्वा प्रकाश हांडे -पाटील, डॉ. चंद्रकांत तुकाराम सावंत, सदानंद भिकू सातारकर, विलास रामनाथ सातारकर या मान्यवरांना त्यांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

या समारंभाच्या यशस्वीतेसाठी सौ. मनिषा लोहार संपादक भास्कर भूषण, जेष्ठ पत्रकार दत्ता मर्ढेकर, चंद्रकांत कुंभार, दगडू माने, महेंद्र गुजर स्वागत प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !