दुचाकीची अज्ञात वाहनास पाठीमागून धडक - घातपाताची शक्यता ?
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
पुणे- सातारा राष्ट्रीय महामार्गावरील जोशी विहीर उड्डाणपुला जवळ लग्न समारंभ उरकून खंडाळहून कुडाळ ता. जावली जि.सातारा आपल्या घरी परत जात असताना पुढे असणाऱ्या अवजड वाहनास पाठीमागून दुचाकी क्रमांक एम एच 11 एजे 26 13 हिरो होंडा स्प्लेंडर या दुचाकीची जोरदार धडक बसल्याने युवकाचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. रविवार दिनांक ४ रोजी रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जुबेर शब्बीर शेख वय २६ राहणार कुडाळ ता. जावली, जि. सातारा असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुबेर शब्बीर शेख हा युवक खंडाळा येथून कुडाळ ता. जावली जि.सातारा आपल्या घरी परत जात असताना जोशी विहीर पुलाजवळ पुढे असणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनास त्याच्या दुचाकीची जोरदार धडक दिली.
त्याच्या डोक्यास व डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. अपघाताचे वृत्त समजतात भुईज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार टकले व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता युवक रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यानी क्षणाचा विलंब न करता हवलदार टकले व त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमीस कवठे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच जुबेर शेखचा मृत्यू झाला होता. अधिक तपास भुईज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार टकले करत आहेत.
घातपाताची शक्यता
मृत जुबेर शेख वय वर्ष २६ राहणार कुडाळ ता.जावली हा युवक फोटोग्राफीचे काम अनेक वर्षापासून करत आहे. नुकताच काही महिन्यांपूर्वी त्याच्यावर प्राण घातक हल्ला झाला होता. मात्र त्यातून तो सुखरूप बचावला तद् नंतर रात्री त्याचा जोशीविहीर पुलाजवळ अज्ञात वाहनास धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. मात्र, त्या ठिकाणी कोणतेही वाहन आढळून आले नाही. त्यामुळे घातपाताची शक्यता वर्तवली जात असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा