जी.एस. महानगर बँकेची रणधुमाळी सुरू
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
जी एस महानगर बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून बँकेच्या अध्यक्षा श्रीमती सुमनताई गुलाबराव शेळके यांच्या नेतृत्वाखाली " संस्थापक अध्यक्ष सॉलिसीटर गुलाबराव शेळके साहेब व श्रीमती सुमन गुलाबराव शेळके " पॅनल " उभा करण्यात आला आहे , अशी माहिती बँकेच्या अध्यक्षा सुमनताई गुलाबराव शेळके यांनी दिली आहे.
जी एस महानगर बँकेचा १९७३ साली सुरू झालेला हा प्रवास एका छोट्याशा ९ बाय १८ चौरस फूट खोलीतून झाला , परंतु ही केवळ बँकेची कहाणी नाही, ही आहे एका स्वप्नाची कथा, जी माझे पती सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी प्रत्यक्षात आणली.
आज जी एस महानगर बँक संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तारली आहे . बँकेचे ८० हजार ४१० भागधारकांचा बँकेवर ठाम विश्वास असून ६८ कोटी ६१ भाग भांडवल आहे . २ हजार ८८४ कोटींची भक्कम ठेव असून राज्यभर ७० शाखांचा विस्तार झालेला आहे . जी एस महानगर बँकेचे हे यश विश्वासाचं, जिद्दीचं आणि सामूहिक प्रगतीचं प्रतीक आहे. "आपली बँक ही , फक्त बँक नाही, तर लोकांसाठी, लोकांनी उभी केलेली चळवळ आहे.
जी एस महानगर बँकेच्या भवितव्यासाठी , दिवंगत गुलाबराव शेळके व ॲड उदय शेळके यांच्या स्वप्नांची पुर्ती म्हणजे त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली च होय , “ संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब व श्रीमती सुमन गुलाबराव शेळके ” पॅनलच्या विचारांना पाठिंबा द्यावा , जीएस महानगर बँकेचे सर्व ग्राहक , हितचिंतक आणि ठेवीदारांमुळे हे शक्य झाले आहे , त्यामुळे मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानत असल्याचे , मत , बँकेच्या अध्यक्षा सुमनताई गुलाबराव शेळके यांनी व्यक्त केले आहे .
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा