maharashtra day, workers day, shivshahi news,

पारनेर येथील पळवे खुर्द च्या ग्रामपंचायतला मिळाली इलेक्ट्रिक कचरा घंटा गाडी

खा. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते केली ग्रामपंचायतीला प्रदान

Sujay Vikhe Patil , Village Panchayat of Palave Khurd got electric garbage bell cart , parner , shivshahi news.

शिवशााही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर) 
2023 व 24 या वार्षिक योजनेतून पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द येथील ग्रामपंचायतला कचरा व्यवस्थापन साठी 5 लाख रुपये किमतीची इलेक्ट्रिक घंटा गाडीची चावी खा. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. गावातील कचऱ्याचे व्यवस्थित  व्यवस्थापन करण्यासाठी वार्षिक योजनेतून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतला नगर येथे खा.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत येथील सरपंच सदस्य व ग्रामस्थांच्या हातात इलेक्ट्रिक घंटा गाडीची चावी प्रदान करण्यात आली. 
यावेळी पळवे खुर्द ग्रामपंचायतचे पदाधिकारी व ग्रामस्थांच्या हाती खा.सुजय विखे पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले जिल्हा परिषदेचे माजी सभापती काशिनाथ दाते सर, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल दादा शिंदे पाटील, वडनेर चे सरपंच लहू भालेकर, गटेवाडी चे सरपंच भरत गट, सेवा सोसायटीचे संचालक  वसंतराव देशमुख, उद्योजक अजय गाडीलकर, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष उद्योजक रवींद्र नवले,उपसरपंच अमोल जाधव, माजी सरपंच नानाभाऊ गाडीलकर, ग्रामसेविका  कविता अवधूत आधी उपस्थित होते..
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !