maharashtra day, workers day, shivshahi news,

खैराच्या झाडांची कत्तल करणाऱ्या तीन आरोपींसह साडे दहा लाखाचा मुद्देमाल जप्त

वाई वनविभागाची धडक कारवाई
Strike action of Y Forest Department , satara , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई - वनविभागाच्या प्रमुख असलेल्या सौ. स्नेहल मगर यांना खास खबऱ्या मार्फत विना परवाना खैराच्या झाडांची कत्तल करुन त्याची चारचाकी वाहनातून  वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच त्यांनी सहकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तयार करुन टाकलेल्या धाडीत ३ आरोपीनसह लाकडाने भरलेला मालट्रक असा तब्बल १० लाख अठ्ठावंन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने विना परवाना झाडे तोडणाऱ्या शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे  धाबे दणाणले आहेत.
वाईच्या वनविभागाच्या प्रमुख स्नेहल मगर यांनी दिलेली माहिती अशी कि वाई तालुक्याचा पश्चिम भाग हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. येथील सह्याद्रीच्या डोंगर रांगान मध्ये जीवनावश्यक असलेल्या विविध जातींची आयुर्वेदीक औषधी वनस्पतींची मोठमोठी झाडे झुडपे आहेत त्याच बरोबर वन्यप्राणी देखील आहेत. या सर्वांच्या सौरक्षणाची जबाबदारी राज्य आणी केंद्र सरकारने निर्माण केलेल्या वनविभागावर सोपवली आहे. या विभागाच्या अधिकारी सौ. स्नेहल मगर आणी सहकारी कर्मचारी २४ तास अलर्ट असतात. दि. २५- ०२-२०२४ रोजी रात्री मिळालेल्या गुप्त बातमी वरून धोम-वाई रस्त्यावर मौजे भोगाव गावाचे हद्दीत वनाधिकारी फिरती तपासणी करीत असताना आरोपी सुरेशभाई तुकाराम नामे, रा. पाळे, जि. रत्नागिरी, युवराज संभाजी पाटील, नामदेव रामचंद्र पाटील दोघे
रा. शिराळा, जि. सांगली टाटा कंपनीच्या क्र.चक -११-ङ-१२८३ मधुन खैर प्रजातीचा लाकुडमाल  वाहतुककामी भरून नेत असताना आढळून आलेने सदर ट्रक वनक्षेत्रपाल वाई कार्यालयाचे आवारात नेवुन लावला. सदर गुन्हेकामी वनरक्षक वाई यांनी गुन्हा नोंद केला असुन पुढील तपास चालु आहे. 
 सदरची कारवाई मा. उपवनसंरक्षक सातारा अदिती भारद्वाज मॅडम, सहा. वनसंरक्षक सातारा महेश झांझुर्णे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल वाई सौ स्नेहल मगर मॅडम, वनपाल वाई एस. आर. मोरे, वनपाल वाशिवली एस. व्हि. लोखंडे, वनरक्षक वाई एस. एस. चौगुले, वनरक्षक जांभळी बी. बी. मराडे यांनी पार पाडली.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !