शहरध्यक्ष प्रा.जीवन पा चव्हाण यांनी दिले नियुक्ती पत्र
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नायगाव शहर उपाध्यक्षपदी अशोकराव घोडके यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना नायगांव शहरध्यक्ष प्रा.जीवन पा चव्हाण यांनी नियुक्ती पत्र दिले आहे त्यांच्या निवडीचे सर्वच स्तरांतून अभिनंदन करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा सरचिटणीस शिवाजीराव धर्माधिकारी, सरचिटणीस डॉ. भगवान गुंजलवाड, कंधार तालुकाध्यक्ष मनोहर भोसीकर, नायगाव तालुकाध्यक्ष हौसाजी शिंदे, सामाजिक न्याय विभागचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोनकांबळे, नांदेड शहर कार्याध्यक्ष फेरोज पटेल, युवा नेते आशिष धर्माधिकारी, युवकचे तालुकाध्यक्ष माधव बेंद्रीकर, दिलीप मंगरुळे, बालाजी कदम, संतोष बावणे, श्रीराम पाटील, गोविंद पा मोरे यांची उपस्थिती होती.
नायगाव शहरातील संघटनात्मक कामाला प्रथम प्राधान्य देणार असून जेष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव शहरध्यक्ष प्रा.जिवन पा.चव्हान यांच्या नेतृत्वाखाली नायगाव शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटनात्मक काम मोठ्या जोमाने मी करणार आहे असे निवडीनंतर दैनिक लोकपत्र शी बोलताना अशोक घोडके यांनी सांगितले.
अशोक घोडके यांची नायगाव शहर उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नायगाव तालुक्यांमध्ये अनेक युवकांनी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा