महिलांना आर्थिक सक्षम व्हावे यासाठी बचत गटाचे प्रदर्शन
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी आरिफ शेख
महिलांना आर्थिक सक्षम व्हावे, यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांतर्गत सिंदखेडराजा शहरात बचत गटाचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये सुजाता बचत गटाच्या वतीने अस्सल गावरान मटण आणि मडक्यावर अस्सल विदर्भातील पाहुणचार असलेला गावरान गव्हाचा मांडा प्रचंड भाव खात आहे.
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय, बुलडाणा व नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्दम विकास प्रकल्पच्या वतीने मातत्तीर्थ सिंदखेडराजा येथील
लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्या समोर महिला बचत गटाचे विविध उत्पन्नाचे सुमारे ३० स्टॉल लावण्यात आले.
त्यामध्ये महिला बचत गटांनी तयार केलेले मसाले, विविध संसार उपयोगी वस्तू, विविध खाण्याचे पदार्थाची स्टॉल लावण्यात आले होते. त्यामध्ये साउथ इंडियन खाद्यपदार्थ, व्हेज, नॉनव्हेज आदीचे स्टॉलला लोकांची पसंती मिळत आहे. या ठिकाणी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
मात्र, खऱ्या अर्थाने चर्चा होत आहे तुळजापूर येथील सुजाता स्वयं सहायता महिला बचत गटाच्या वतीने चिकन, मटण मांडेच्या स्टॉलची. या स्टॉलवर मटण मांडे खाणाऱ्यांनी प्रचंड गर्दी होत असून अस्सल चुलीवर बनवलेले मटन आणि मडक्याच्या मांडरानावर अत्यंत कलाकुसरीने हातावर गावरान गव्हाच्या पिठाची चांगली मालिश करून बनविलेले मांडे खवय्यांना आकर्षित करीत आहेत.
-
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा