तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी ओबीसी आरक्षण विरोधी मराठा आरक्षण संदर्भात काढलेला जी.आर. रद्द करून न्यायमुर्ती संदिप शिंदे समिती आणि न्यायमूर्ती सुनिल शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्ग आयोग बरखास्त करावा या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी श्री परदेशी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओबीसी जनमोर्चा हिंगोली जिल्ह्याच्या वतीने देण्यात आले. तसेच ओबीसी आरक्षण विरोधी जी.आर.त्वरीत रद्द नाही केला तर आठ दिवसांनंतर ओबीसी जनमोर्चा च्यावतीने हिंगोली जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला.
या शिष्टमंडळात ओबीसी जनमोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष डॉ.बी.डी.चव्हाण,ओबीसी जनमोर्चा हिंगोली जिल्हाध्यक्ष ॲड.रवि शिंदे,अशोकदादा नाईक, सेवानिवृत्त आयुक्त दिपकराव वडकूते, डॉ.नागोराव जांबूतकर, प्रा.साहेबराव देवकते,उमेश गोरे, विठ्ठल गाभणे,अशोकराव करे, ॲड .पंजाब चव्हाण,हकीम बागवान,ॲड.ऋषिकेश देशमुख,संजय राठोड,साहेबराव मस्के,प्रा.गजानन कुटे, बालाजी देवकर, रविंद्र गडदे, पुंजाराव वाघमारे,प्रकाश गिराम,गणपत सातव,संजय दराडे,निखिल घुगे, बाजीराव मस्के, बाळू सुर्वे, गजानन मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसी जनमोर्चा हिंगोली जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा