परिसरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करण्याची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
राजमाता राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा येथील विविध विकास कामासाठी इतिहास अभ्यासक छगन झारे यांनी तारीख ३१ जानेवारीपासून राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्या समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
सिंदखेडराजा शहरासह परिसरात ऐतिहासिक व पुरातन २२ विहिरी, बारव तलाव आहेत त्याचे उत्खनन व खोलीकरण करण्यात याचे, कारण शेतीसाठी याचा फायदा होईल खडकपूर्णा धरणातून पाणी सिंदखेड राजांमध्ये आणण्यासाठी कालवा बांधण्यात यावा जेणेकरून शेतीला याचा फायदा होईल. सिंदखेडराजा शहरातील अंतर्गत रस्ते सड़का तात्काळ नवीन बनविल्यात बाध्यात तसेच भुयारी गटार करण्यात यावे. शहरात नवीन पाईपलाईन झाल्यामुळे सर्व रस्ते खराब झाले आहे तसेच सिंदखेड राजा शहरातील १७ बात १७ ठिकाणी पाण्याचे एटीएम मशीन बसवून सिंदखेडराजा शहरातील केंद्रीय पुरातत्व खाते व राज्य पुरातत्व खाते यांच्या ताब्यातील ऐतिहासिक वास्तूची दुरुस्ती व संवर्धन करण्यात यावे, सर्व ऐतिहासिक वास्तूंना जाण्यासाठी रस्ता लाईट तसेच प्रत्येक ऐतिहासिक वास्तू जवळ बगीचा पर्यटकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व अन्य सुविधा देण्यात यावे. यासह अन्य मागण्यासाठी आमरण उपोषण मुरू केले आहे.
छगन झोरे यांच्या उपोषणाला विविध राजकीय पक्षांनी आपला पाठिंबा दिला आहे. त्थामध्ये काँग्रेसचे नेते मनोज कायंदे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गट जिल्हाध्यक्ष अँड नाझेर काझी यांनी मुंबई येथे मोबाईल द्वारे जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी छगन झोरे यांच्यासोबत चर्चा करून दिली.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख छगनराच मेहेत्रे, राष्ट्रवादीचे युवा नेते विजय तायडे, त्र्येश सामाजिक कार्यकर्ते भगवानराव सातपुते, शेतकरी नेते दिलीप चौधरी, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव जाधव, सावता परिषद जिल्हाध्यक्ष शाम मेहेत्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र अंभोरे, शहर अध्यक्ष सिद्धार्थ जाधव, नगरसेवक नरहरी तायडे, युवा नेते कैलास मेहेत्रे, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष दीपक ठाकरे, माजी नगरसेवक काशिनाथ ठाकरे, भाजपाचे युवा नेते अँड संदीप मेहेत्रे, व्यापारी बालूशेठ शेबाले, उदन सेनेचे युवा नेते योगेश मस्के, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव डॉक्टर कृष्णा काळे, जनरोबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर मेहेत्रे, व उपाध्यक्ष उमेश खरात, शेतकरी नेते बालाजी सोसे, व्यापारी अमोल ढाकरे, छाचा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद टेके, माजी नगरसेवक रामदास केळकर, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष शिबादादा पुरंदरे, अनिल मेहत्रे डॉ. भीमराव मस्के, अमोल भट, शहाजी चैधरी, यशवंत झोरे, बबन मेहेत्रे, शिवा बागले, आनंता गायके, संतोष बरडे आदी मान्यवरांनी उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा