बुथ कमिटी प्रशिक्षण शिबिरात मा.खा.भास्करराव पा.खतगावकर यांचे प्रतिपादन
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी, शिवाजी कूंटुंरकर
एकमेकांवर टीका करताना आपण मागे वळून पाहणे गरजेचे आहे कारण टिकेने व्यक्ती मोठा होत नाही तर विकासात्मक कामे केल्यानंतर लोकांकडून तो व्यक्ती मोठा ठरवू शकतो नांदेड जिल्ह्यात अनेक पारदर्शकपणे कामे स्वर्गीय शंकराव चव्हाण, अशोकराव चव्हाण यांच्याकडून झालेली आहे म्हणून चव्हाण परिवारांनी समाजासोबत विकासात्मक बांधिलकी ठेवलेली आहे असे प्रतिपादन नायगाव येथे बुथ कमिटी प्रशिक्षण शिबिरात मा.खा. भास्करराव पाटील खतगावकर यांनी केले.
शहरातील जयराज पॅलेज मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बूथ कमिटी प्रशिक्षण शिबिर आ.अमर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या वेळी मा.आ. वसंतराव चव्हाण प्रमुख मार्गदर्शक म्हणून अभिजीत सकपाळ यासह डॉ .मीनलताई खतगावकर, शिवाजीराव धर्माधिकारी, आनंदराव पाटील चव्हाण, गोविंदराव सिंधीकर, किशोर स्वामी, मीनाक्षीताई कागडे, संजय शेळगावकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती, प्रारंभी प्रस्ताविक युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांनी केल्यानंतर नायगाव उमरी धर्माबाद तालुक्यातील बूथ कमिटी कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख अभिजीत सकपाळ यांनी केले.
तर अमर राजूरकर यांचेही मनोगत यावेळी झाले. खतगावकर पुढे बोलताना म्हणाले की भाजपाचे नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी चव्हाण परिवारावर कुठेही टीका टिपणी करीत आहेत. पण मी चिखलीकरांना सांगू इच्छितो की, आपण जिल्हा परिषद सदस्य शंकररावजी चव्हाण मुळे झालेले आहात त्याचा मी साक्षीदार आहे आपल्या चिखली गावात पाणी बारूळ धरणाचे मिळते तर नांदेड येथे पाणी विष्णुपुरी धरणाचे मिळत आहे हे दोन्ही धरण स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांनी बांधले आहेत आपण 22 कोटी रुपये मंजूर करून आणले त्यातील दहा कोटी कंधार र्लोहा साठी दिले पण आपण नांदेड जिल्ह्याचे खासदार आहात ते दोन तालुके नांदेड मतदार संघात येत नाहीत असे असताना चव्हाण परिवारांना टीका करणे हेच तुमचे भांडवल आहे असेही ते म्हणाले.
यावेळी धर्माबाद तालुकाध्यक्ष दत्ता हरी पाटील चोळाकेकर, उमरी तालुका अध्यक्ष प्रल्हाद ढगे ईजतगावकर, नायगाव तालुका अध्यक्ष संजय बेळगे यासह मागासवर्गीय सीलचे जिल्हाध्यक्ष मनोहर पवार, श्रीनिवास पाटील चव्हाण, सय्यद रहीम शेठ, मनोज पाटील मोरे,बालाजी मद्देवाड,बाबुराव पाटील अडकिने, प्राचार्य बाबासाहेब शिंदे, शिवराज वरवटे, रेखा मॅडम बनसोडे,सौ. महानंदा गायकवाड,चंद्रकांत आईलवार, माणिक पाटील चव्हाण यासह महिला पुरुष काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दत्ता मामा येवते तर आभार मनोहर पवार यांनी मानले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा