शोभा यात्रे त एका पेक्षा एक आकर्षक देखाव्यानिप्रेक्षकांचे मने जिंकली
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नांदेड जिल्हा स्तरीय 49 वा स्काऊट गाईड मेळावा नायगाव तालुक्यातील कुंटूर तांडा येथे संपन्न होत आहे त्यानिमित्ताने सोमवारी सकाळी भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन कुंटुर तांडा व कुंटुर गावातील प्रमुख रस्त्यावर करण्यात आले होते.या शोभायात्रेचा शुभारंभ राजेश देशमुख कुंटुरकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून तर माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यातआला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गटविकास अधिकारी एल आर वांझे हे होते तर गटशिक्षणाधिकारी नंदकुमार काकडे,रुपेश कुंटुरकर,कुंटुर ठाण्याचे सपोनि रामकृष्ण पाटील,बालाजी पवार,जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे,डाँ विलास पवार,वेंकट नकाते,या सहसर्व केंद्र प्रमुख,मुख्याध्यापक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
कुंटुर तांडा छोटे गाव असल्याने तांडा येथून विद्यार्थ्यांना जीप,ट्रॅव्हल्स,कार,या वाहनाने कुंटुर येथे ओयसिस इंग्लिश स्कुल येथुन ही यात्रा शांतिनिकेतन शाळा,पोलीस ठाणे,देशमुख गढी, मार्केट यार्ड,दर्गा रोड मार्गे हनुमान मंदिर,बसस्टँड,जि.प.हायस्कुल येथे विसरजीतकरून त्या ठिकाणी जि.प.हायस्कुल कुंटुर कर्मचाऱ्यांच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला.
अतिशय सुंदर असे देखावे सर्व स्काऊट गाईड,कब बुलबुल पथक यांनी दाखवले,लेझीम,टिपरी नृत्य,वारकरी नृत्य,परेड,लोकशाही ला पोषक देखावे,संविधान ,बेटी बचाव,अशा प्रकारचे संदेश देणारे देखावे या शोभयात्रेचे आकर्षण ठरले होते. शोभा यात्रा व त्यामधील काही दृश्य ही कुंटुर व परिसरातून आलेल्या नागरिकांची मने वेधून घेत होती.आयोध्या च्या धर्तीवर राम लक्ष्मण सीता व त्यांचे राज्य या विषयीच्या घडामोडी दृश्य या यात्रेत लक्षणीय ठरत होते.ड्रेसिंग, आकर्षक कपडे,हे सर्व मनमोहून टाकणारे होते जि.प.प्रा शाळा सांगवी यांनी बैल गादीवर हती त्यावर विराजमान राजकन्या हा देखावा लक्षणिय ठरला.शिक्षकांनी घेततलेली मेहनत स्काऊट प्रमुक इरले,प्रलोभ कुलकर्णी,बेंडे,पावडे, बेळगे,तीपलवाड सर,नलबल वार सर, साधू सर,रेडेवाड सर,मावले सर,हानवटे सर,चिकलवाड, पचलिंग,उद्धव ढगे,कपिल गारठे,मठपती शेळगावकर,आदीने घेतलेली मेहनत शोभायात्रेच्या माध्यमातून फळाला आली.
शेकोटी कार्यक्रमाने मेळाव्यात रंगतजिल्हा स्तरीय स्काऊट गाईड मेळाव्याच्या प्रथम दिनी व द्वितीय दिनी शेकोटी कार्यक्रमा अंतर्गत एका पेक्षा एक कार्यक्रम व गीतावरील नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.विद्यार्थी व प्रेक्षक यांनी भरभरून प्रतिसाद दिला.मंगळवारी सकाळी 11 वा.या मेळाव्याचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रमाने समारोप होणार आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा