मुख्य जलस्रोत मुळा धरण करण्यासाठी हालचाल सुरु विश्वनाथ कोरडे
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर जिल्हा प्रतिनिधी सुदाम दरेकर
कान्हुर पठार कान्हूर पठार सह सोळा गाव योजनेचा मुख्य जलस्रोत मांडओहळ ऐवजी मुळा धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातून करण्याचा मार्ग खुला झाला असून महाराष्ट्र राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना तशा पद्धतीचा प्रस्ताव करण्याच्या सूचना काल गुरुवार दि.२२ फेब्रुवारी २०२४ रोजी दिल्या असल्याची माहिती महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी दिली आहे.
कान्हूर पठार सह सोळा गाव योजनेच्या निर्मितीसाठी व दुरुस्तीसाठी शासनाने आजवर कोट्यावधी रुपये खर्च केलेले असून या योजनेचा मुख्य जलस्रोत असलेल्या मांडओहळ धरणातच एप्रिल, मे व जून महिन्यांत पाणी शिल्लक राहत नसल्याने या योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांना ऐन उन्हाळ्यात पाण्याची आवश्यकता असताना पाणी उपलब्ध होत नाही . परिणामी ही योजना असून नसल्यासारखी ची परिस्थिती निर्माण झाल्याचे कान्हूर पठार व परिसरातील स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्याने खासदार डॉ.सुजय विखे पाटील हे मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी २०२४ रोजी पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता ,पारनेर येथे कान्हूर पठार भागातील शेतकऱ्यांच्या वतीने पाणी पुरवठा योजनेची मागणी करण्यात आल्याचे सांगत खासदार विखे पाटील यांच्याच मार्गदर्शनाखाली सबंधित पाठपुरावा सुरु असल्याची माहिती महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी दिली.
पारनेर तालुक्याचा पठार भाग हा सातत्याने निसर्गाच्या अवकृपेमुळे दुष्काळाच्या झळा सोसत आलेला असून गेल्या कित्येक वर्षांपासून एप्रिल ते जून महिन्यांत या भागातील प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होत असते. या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठीत कोट्यावधी रुपयांची योजना निर्माण केलेली असूनही सातत्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो. ही बाब निदर्शनास आल्याने केवळ सबंधित योजनेचा जलस्रोत अभ्यासपूर्वक निवडला नसल्याने नागरिकांना वर्षानुवर्षे पिण्यासाठीच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे कोरडे यांनी खासदार विखे पाटील व पालकमंत्री ना . विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून देत त्यावर कायमस्वरूपीचा उपाय म्हणून मुळा धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातून सबंधित योजनेचा जलस्रोत निर्माण केल्यास पारनेरच्या पठार भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी निकाली निघेल असे सुचविले असता पालकमंत्र्यांनी त्याला समती दाखवत तश्या जीवन प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत , असे ही कोरडे यांनी सांगितले .
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा