आमदार बांगर रूग्णालय प्रशसनावर संतापले, डॉक्टरांनी मागितली माफी
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली ते वाशिम महामार्गावरील माळहिवरा शिवारात भरधाव पिकअप वाहनाने भाविकांना पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार जण ठार तर ४ जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. यावेळी गंभीर रुग्णांना कोणीच बघायला तयार नव्हते यावेळी बांगर संतापले व डॉक्टरांना चांगलेज झापले. यावेळी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक मोरे यांनी दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की हिंगोली तालुक्यातील सिरसम येथील भाविक दर शनिवारी सिरसम येथून पायी माळहिवरा फाटा येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी येतात. नेहमी प्रमाणे हे भाविक २४ फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास पहाटेच सिरसम येथून माळहिवरा येथे पायी निघाले होते. सर्व भाविक माळहिवरा शिवारात आले असतांना हिंगोलीकडून अमरावतीकडे भाजीपाल्याचे रिकामे कॅरेट घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाने भाविकांना पाठीमागून धडक दिली.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी तसेच हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय रामोड, यांच्या पथकाने सर्वांना हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र रूग्णालयात गंभीर रूग्णाला कोणीही बघायला तयार नव्हते यावेळी आमदार संतोष बांगर व युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम यांनी डॉक्टर व तेथील कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. गंभीर रुग्णाचा एक्सरे काढण्यासाठी कोणीच उपलब्ध नव्हते. आमदारांनी संताप व्यक्त करताच रुग्णालयातील डॉक्टरांनी धावपळ करून व रूग्णांवर उपचार केले. यावेळी डॉ नंदकिशोर करवा, डॉ मोरे यांनी दिलगिरी व्यक्त केली. तर बांगर यांनी ईतर जखमी रूग्णांना खाजगी दवाखान्यात जाऊन मदत केली व नांदेड येथे रेफर केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा