जिजाऊ जन्मस्थळाचा विकास व्हावा यासाठी आमदार शिंगणे यांच्या प्रयत्नांना यश
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी आरिफ शेख
राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजा विकास आराखड्यातील जिजाऊ सृष्टी येथील विकास कामांकरिता ४९ कोटी ७१ लाख रुपये निधी मंजूर झाला असून त्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. जिजाऊ सृष्टी येथे येणाऱ्या जिजाऊ भक्तांच्या सोयी सुविधांसाठी तसेच जिजामातेंच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी प्रयत्नशील असतात. जिजाऊ जन्मस्थळाचा विकास व्हावा यासाठी आमदार शिंगणे यांच्या प्रयत्नातून खालील कामांना निधी मंजूर होऊन प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.
जिजाऊ सृष्टी सिंदखेड राजा जि. बुलढाणा येथे प्रशासकीय इमारत, सोव्हेनियर शॉप व कॅफेटेरिया बांधकाम करणे. रु. ११ कोटी ३० लक्ष, महीला पर्यटक व कलाकारांसाठी निवासी व्यवस्था बांधकाम करणे. रु.१४ कोटी ५९ लक्ष, सांस्कृतिक सभागृह व निवासी व्यवस्था बांधकाम करणे. रु.१५ कोटी ९९
लक्ष, प्रार्थना व प्रबोधन कक्षचे बांधकाम करणे. रु. ७ कोटी ८३ लक्ष असा एकूण- रुपये ४९ कोटी ७१ लाख एवढा निधी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नांतून मंजूर झाला असून त्यास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. या मंजूर कामांमधून मातृ तीर्थ सिंदखेडराजा शहर व जिजाऊ सृष्टीच्या विकासामध्ये भर पडली जाणार आहे. याच बरोबर शहरातील विविध भागामध्ये ८२ लाख ८३ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये निधी नवे विद्युत रोहीत्र बसविणे तसेच इतर विद्युत कामे याकरिता प्राप्त झाला असून त्याला प्रशासकीय मान्यता देखील प्राप्त झाली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा