विधानसभा युवा नेतृत्व गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांची बिनविरोध निवड
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कूंटुंरकर
दि. 23 /02 /2024 रोजी नायगाव शहरामध्ये नायगाव विधानसभा युवा नेतृत्व गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल, खासदार डॉ.अजितजी गोपछडे, साहेब आपल्या गावाकडे जात असताना दौऱ्यामध्ये सदिच्छा भेट देत असताना गजानन पाटील चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने पुढील कार्यास
शुभेच्छा देण्यात आले .
तसेच राज्याचे ज्येष्ठ नेते मा श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्यासह डॉ.सौ.मेधाताई कुलकर्णी श्री अमरभाऊ राजूरकर यांचा भाजपा प्रवेश तथा विधीमंडळ पक्ष कार्यालय मुंबई येथे उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे साहेब भाजपा मुंबई शहराध्यक्ष आशिषजी शेलार साहेब यांच्या वतीने खऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना न्याय मिळाला असे वक्तव्य गजानन पाटील चव्हाण यांच्या वतीने करण्यात आले
तसेच भाजपा वरिष्ठ नेत्यांचे आभार व्यक्त केले.
या सह सर्व नवनिर्वाचीत राज्यसभा सदस्यांचे भारतीय जनता पार्टी नायगाव विधानसभा शहर व ग्रामीणच्या वतीने अभिनंदन करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाजपा नेते बालाजी बच्चेवार माजी जिल्हा परिषद सदस्य माणिक लोहगावे डॉ सचिन उंबरेकर, भाऊराव पाटील चव्हाण, शिवाजी पाटील वडजे, ॲड श्रीहरी कदम, शंकर भाऊ वडपत्रे किशोर महाराज धर्माबादकर, साहेबरावजी गायकवाड लघुळकर, माधव वसंतराव चव्हाण, अशोक पवार, शंकर चव्हाण, गणेश देगाव, किरण मोरे, श्रीनिवास देगावे, माधव कुडकेकर, यांच्यासह आदी मान्यवर प्रामुख्याने संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा