maharashtra day, workers day, shivshahi news,

सिंदखेड राजा तहसीलदार सचिन जैस्वाल यांनीं तोडले अवैध रेती वाहतूक होणारे छुपे रस्ते

अवैध छुपे रस्ते तोडल्यामुळे अवैध गौणखनिज वाहतुकीवर पुर्णत: आळा बसला
Illegal sand transport , Crackdown on illegal secondary mineral transport due to illegal hidden roads , Sindkhedaraja , shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा,  सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी आरिफ शेख

 सिंदखेडराजा तालुक्यातील अवैध रेती व इतर गौणखनिज उत्खनन व वाहतुक करण्यासाठीं तयार करण्यात आलेले राहेरी बु. आणि हिवरखेडपुर्णा येथील अवैध छुपे रस्ते आज तहीलदार सचिन जैस्वाल यांनी तोडून टाकले आहेत. तसेच सिंदखेडराजा तालुक्यातील ईतर अवैध गौणखनिज वाहतुकीसाठी असणा-या छुप्या रस्याचा शोध घेऊन सदर रस्ते तोडण्याची कार्यवाही सुरु केली आहे. 
सिंदखेडराजा तालुक्यातील अवैध छुपे रस्ते तोडल्यामुळे अवैध गौणखनिज वाहतुकीवर पुर्णत: आळा बसलेला आहे. तसेच आवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतुक होणार नाही. या साठी  मंडळअधिकारी व तलाठी यांचे पथक गठीत करुन या पथकाच्या माध्यमातून  धडक कारवाई करण्यात येत असल्यामुळे अवैध गौणखनिज वाहतुक करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर ब्रेक लागला आहे. सिंदखेडराजा तालुक्यामध्ये अवैध गौणखनिज वाहतुक करणा-यांविरुध्द मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई ह्या पथकाच्या माध्यमातून थेट कार्यवाही केल्यामुळे अवैध गौणखनिज वाहतुक करणा-यांच्या मनामध्ये महसुल प्रशासनाचा धाक बसवण्यात तहसीलदार  सचिन जैस्वाल हे यशस्वी झाले आहेत.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !