शिवजन्मोत्सवानिमित्त भव्य सांस्कृतीक स्पर्धाचे आयोजन
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली येथील शासकीय विश्राम गृहात सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीची बैठक आयोजन ४ फेब्रुवारी रविवार रोजी समितीचे अध्यक्ष अॅड. रमेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सांस्कृतीक स्पर्धेचे आयोजनाचे नियोजन करण्यात आले. रविवार १८ फेब्रुवारी रोजी सांस्कृतीक स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळा परिसरातील शिवविचार पिठावर सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. या स्पर्धेत नृत्य, समुहनृत्य, अभिनय, वेशभुषा व गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
नृत्य स्पर्धेत समुह नृत्य खुल्या गट, वैयक्तीक नृत्य बालगट, वैयक्तीक नृत्य मोठा गट, अभिनय स्पर्धेत बालगट व खुला गट, वेशभुषा स्पर्धेत बाल गट व खुला गट व गायन स्पर्धेत बालगट व खुला गट अशा विविध गटात स्पर्धा संपन्न होणार आहेत. विजेत्या स्पर्धेकांना प्रथम, द्वितीय, तृतीय एकूण २७ विजेत्यांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र देवुन मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी राजु लोखंडे, सागर चौधरी, कृष्णा गिरी, प्रेम मस्के, सुरज काशिदे, आयुष्का झाडे, शिल्पा नर्सीकर, अक्षय वानखेडे, साक्षी भुसांडे, बालाजी शिंदे, प्रशात देशमुख, संतोष दिपके, प्रणिता कौलवार यांची संयोजन समिती असणार आहे. स्पर्धेकांनी स्पर्धेच्या नियमावली करीता संयोजन समितीच्या सदस्यांना संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
नियोजन बैठकीला समिती अध्यक्ष अॅड. रमेश शिंदे यांच्यासह समिती उपाध्यक्ष अॅड. स्वप्नील इंगळे, सचिव पवन जाधव, सहसचिव सचिन जाधव, सुरज वडकुते, अॅड, दिलीप भाकरे, कोषाध्यक्ष सुमित कांबळे, मार्गदर्शन समितीचे कल्याण देशमुख, भुषण देशमुख, अॅड. अमोल जाधव यांच्यासह पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा