गोरेगाव येथील महाआरोग्य शिबिरात 567 जणांनी केली विविध आजाराची आरोग्य तपासणी
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी हिंगोली चंद्रकांत वैद्य
या महाआरोग्य शिबिराला सरपंच गंगुबाई कावरखे, पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर, तलाठी प्रदीप इंगोले, ग्रामसेवक गोपाल सालेगावकर, दासराव कावरखे, ग्रामपंचायत सदस्य सुनील कावरखे, दिलीप कावरखे, अमोल खिल्लारी, खासदार हेमंत पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कावरखे, सुनील कांबळे, बंडू देवडे, श्याम रणबावळे, भागवत नालींदे, शालिग्राम कावरखे, पवन मगर, संतोष माहोरकर, सुनील खिल्लारी, श्याम कावरखे, ज्ञानेश्वर पातळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संकल्पनेतून व खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने गोरेगाव येथील महाआरोग्य शिबिरामध्ये एकूण 567 जणांनी विविध आजारांची तपासणी केली आहे. यामध्ये सिकलसेल 238, एच आय व्ही 114, सीबीसी 46, एच बी सी 40, बी एस एल 20, एल एफ टी 40, के एफ टी 40, आर बी एस 103, थुंकी 06, त्वचा 47, डोळ्याचे आजार 65, अस्थिरोग 86, स्त्रीरोग 61, बालरोग 54, एनसीडी 73, पी एम जे ए 44, इतर रोग यामध्ये 106 यांनी तपासणी केली आहे. या सर्व रुग्णांना औषधोपचार व योग्य मार्गदर्शन डॉक्टरांच्या पथकाने केले.
या महा आरोग्य तपासणी शिबिराला मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे सोमनाथ हटेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश रुणवाल, वैद्यकीय अधिकारी वसंत पाटील, डॉक्टर गजानन चव्हाण, डॉक्टर प्रियंका देशमुख, डॉक्टर शहनाज, डॉक्टर माधव वानखेडे, डॉक्टर विजय बोरकर, डॉक्टर अजय जाधव, डॉक्टर हनुमान सावके, डॉक्टर दिपाली इंगोले, डॉक्टर स्वाती मगर, शुभम कदम, पवन शिंदे, पल्लवी भाले, उर्मिला पवार यांच्या उपस्थितीत गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल खिल्लारी तर आभार विठ्ठल कावरखे यांनी मानले.
आज कापडसिंगी येथे होणार आरोग्य तपासणी
योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी या आरोग्य विषयक उपक्रमातून सेनगाव तालुक्यातील गोरेगाव, कापडसिंगी, कवठा, साखरा या प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध आजारांची मोफत तपासणी होणार आहे. त्या अनुषंगाने 6 फेब्रुवारी रोजी कापडसिंगी प्राथमिक आरोग्य केंद्र, 7 फेब्रुवारी रोजी कवठा प्राथमिक आरोग्य केंद्र, 8 फेब्रुवारी रोजी साखरा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तपासणी होणार आहे. तरी या परिसरातील सर्व गरजूंनी आरोग्य तपासणी करून घेण्याचे आव्हान खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा