लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विदयालयाची मूलाची अध्ययन क्षमाता उत्तम आहे
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर जिल्हा प्रतिनिधी सुदाम दरेकर
आंध्रप्रदेश च्या हैदराबाद येथील समग्र शिक्षण अंतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियान या उपक्रमाचे राज्याबाहेर शालेय अभ्यास सहलीसाठी रयत शिक्षण संस्थेचे नगर येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे अव्दैत विवेक गहाणडुले , आश्लेषा विवेक गहाणडुले हे भाऊ बहीण व मयुर शंकर पवार या तिघांची निवड करण्यात आली आहे .
नगर जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेचे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विदयालयाची निवड करण्यात आली . ही निवड करताना जिल्ह्यातील ज्या शाळांच्या विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता अतिशय उत्तम आहे , अश्या शाळां मधील हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व बक्षीस देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्याबाहेरील शैक्षणिक दृष्ट्या प्रगत राज्यातील शैक्षणिक अभ्यास करून विदयार्थां ची वैचारिक देवाणघेवाण , सांस्कृतिक वाढ व आनंद दायी , समाधान कारक शिक्षण करणे , सामान्य ज्ञानात भर पडेल , देश पातळीवरील भौगोलिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती होईल , नव नवीन शैक्षणिक उपक्रम , शिक्षण पध्दती समजून घेण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यां साठी एकत्रित आंध्रप्रदेश मधील हैदराबाद जवळील तेलंगणा मध्ये या शैक्षणिक अभ्यास सहल आयोजित करण्यात आली.
असून रयत शिक्षण संस्थेचे नगर जिल्ह्यातील एकमेव नगर शहरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालया ची निवड करण्यात आली , त्या विद्यालयातील तीन विदयार्थ्यांची व एका शिक्षकाची निवड करण्यात आली आहे . या शाळेतील शिक्षकांची शिकविण्याची पध्दत , विद्यार्थ्यां कडून अभ्यास करून घेण्याची पद्धत , शिक्षण व आकलन पध्दतीच्या सुयोग्य वापर यामुळे ही शाळा नगर जिल्ह्यात शैक्षणिक दृष्ट्या सक्षम व प्रगत म्हणून ओळखली जाते .
नुकत्याच संपन्न झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत नगर जिल्हा गुणवत्ता यादीत जिल्ह्यात सर्वात जास्त गुण मिळविलेले २५ विद्यार्थ्यां मधून या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे ३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे . यामध्ये अव्दैत गहाणडुले व आश्लेषा गहाणडुले हे दोन्ही विद्यार्थी पारनेर तालुक्यातील रांधे येथील व श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे कार्यरत असलेले शिक्षक असलेले विवेक दत्तात्रय गहाणडुले व नगर तालुक्यातील खडकी येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका जयश्री विवेक गहाणडुले यांचे मुले असून त्यांची या आधी हैदराबाद येथील आंतर राष्ट्रीय वैज्ञानिक आंतरशाळा असलेल्या इस्रो मध्ये ही अभ्यास सहली साठी निवड झाली होती , तेथे त्यांची अनेक शास्त्रज्ञां बरोबर वैचारिक देवाण घेवाण झाली आहे.
या माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया काकडे , प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके , शिक्षक महादेव भद्रे , इतर शिक्षक , पालक व यशस्वी विद्यार्थी यांचे रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे विभागीय सल्लागार समितीचे अध्यक्ष आ . आशुतोष काळे , मॅनेजिंग कौन्सिल कमिटीचे सदस्य , माजी आ . दादाभाऊ कळमकर , जनरल बॉडी सदस्य , माजी नगरसेवक ज्ञानदेव पांडुळे , उत्तर विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे , सहाय्यक विभागीय अधिकार प्रमोद तोरणे , अर्जुनराव पोकळे , अनिलराव साळुंके , शाळा समिती सदस्य अंबादास गारूडकर , सल्लागार समिती सदस्य विश्वासराव काळे , सेवानिवृत्त कैलासराव मोहिते , विष्णूपंत म्हस्के , श्यामराव व्यवहारे , बाबासाहेब नाईकवाडी व इतर मान्यवरांनी कौतुक केले आहे .
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा