डॉ. सुजय विखे पाटील यांनी मोदीजी चे आभार व्यक्त केले
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर जिल्हा प्रतिनिधी सुदाम दरेकर
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “सबका साथ सबका विकास” या धोरणाखाली देशातील समाज घटकातील शेवटच्या माणसाचा विकास होत असल्याचे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे पाटील केले आहे. ते पारनेर येथील साहित्य वाटप समारंभात बोलत होते.
पारनेर येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते मोफत दिव्यांगांच्या साधनांचे वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रतिभा लोकसंचित केंद्र पारनेर अभियान व्यवस्थापन कक्ष अंतर्गत ग्रामीण स्वयंरोजगार निर्मितीनुसार स्वयंरोजगार विक्री केंद्र, फूड प्रोसेसिंग युनिट,औजारे , बँक व बचत गटातील महिलांना बँक कर्ज वाटप करण्यात आले.
यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जात आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देश जागतिक महासत्ता बनण्याच्या वाटेवर आहे. अशातच देशातील सर्वात शेवटच्या माणसाचा विकास कसा होईल, याचा विचार आणि आखणी पंतप्रधान मोदी करत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोककल्याणाची कामे होत आहेत. यामुळे मी मोदींचे आभार व्यक्त करतो असे डॉ. विखे म्हणाले.
खासदारांनी लोकांना आवाहन करताना सांगितले की, सदरचे वर्ष हे निवडणुकीचे असून अनेक प्रलोभने दिली जातील, पण आपले मतदान करताना आपण सतर्क असले पाहिजे , केवळ मोठमोठ्या आश्वासनाला बळी न पडता सुशिक्षित व्यक्तीला मतदान करा ,असे आवाहन डॉ. विखे यांनी केले. तर तुमचा पुढील खासदार कसा हवा? आणि कसा नको, याचे विश्लेषण करा, यावेळेस तुम्हाला लोकसभेत कोणाला पाठवायचे याचा निर्णय घ्यायचा आहे. हे करताना तुम्हाला तुमचा खासदार हा वाळू तस्करांना व गुंडांना पोसणारा हवाय की, आणखी कोण हे ठरवावे लागणार आहे. यासाठी तुमच्या मुला- मुलींसमोर या निवडणुकीतील सर्व उमेदवारांचे फोटो ठेवा आणि त्यांना विचारा, ‘तुम्हाला कोणासारखं व्हायचंय’! त्यांनी मी सोडून कोणाच्याही फोटोला हात लावला तर आपण खुशाल त्याला मतदान करा! असे खुले आव्हान खा. डॉ. सुजय विखे पाटील केले तसेच खासदारकीच्या कालावधीत नगर जिल्ह्यासाठी दहा हजार कोटींची कामे केल्याचे शेवटी सांगितले .
याप्रसंगी काशिनाथ दाते ,भाजप तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, विश्वनाथ कोरडे, डॉ भाऊसाहेब खिलारी,बंडू रोहकले, गणेश शेळके, वसंतराव चेडे,सचिन वराळ,दूध संघाचे अध्यक्ष दता पवार, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पंकज कारखिले, लहू भालेकर,ओंकार मावळे यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा