maharashtra day, workers day, shivshahi news,

उद्या पारनेर तहसिल समोर रास्ता रोको आंदोलन करणार शरद पवळे (शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते)

शेतरस्त्यासाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांची चुप्पी
Rasta Roko Movement , Sharad Pavle ,parner ,shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा,पारनेर जिल्हा प्रतिनिधी  सुदाम दरेकर
उपोषणाच्या सातव्या दिवशी दुसऱ्या शेतकऱ्याची प्रकृती ढासाळली आरोग्य विभागाकडून हलगर्जीपणा - पवळे
  महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातून  शेतरस्त्यांसाठी गरजवंत शेतकऱ्यांचे  धरणे धरत आमारण उपोषण चले जाव आंदोलन जिल्हाभरात सुरू असताना पारनेर  तहसील कार्यालयात शेतरस्त्यांची हजारांच्या आसपास प्रकरणे प्रलंबित असून  गरजु शेतकरी पारनेर तहसीलवर शेतकरी हेलपाटे मारत असुन अधिकार्यांकडून  उडवाउडवीची उत्तरे तहसिलवर दिली जातात. शेतकरी मोठ्या आशेने अधिकांऱ्याकडे येतात परंतु प्रकरणे प्रलंबित ठेवत आर्थिक मागणी तहसील कर्मचाऱ्यांकडून केली जात असुन   राजकीय वजनाबरोबर,आर्थिक वजनाच्या आधारे तहसीलवर शेतरस्ता मिळतो परंतु गरीब गरजवंत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम तहसीलवर सुरू असल्याचा आरोप शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी केला आहे.
        दि.१५ फेबुवारीपासून शेतकऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या तहसिलदारांसह संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी सप्तपदी , महाराजस्व अभियानासह संभाजीनगर उच्चन्यायालयाच्या खंडपिठाच्या आदेशाचा पारनेर तहसिलकडून न्यायालयाबरोबर शेतकरी, जिल्हाधिकाऱ्यांचा अवमान करत शेतकऱ्यांचा छळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबीत करावे, शिवपानंद शेतरस्त्यांच्या हद्दी निश्चित करून नबऱ्यांचे सर्वेक्षण करत नंबरी हटवणाऱ्यांना दंड सुरू करावेत, पुन्हा पारदर्शक महाराजस्व अभियान राबवून ग्रामशेरस्ता समित्यांच्या स्थापनेचे तातडीने आदेश देत शासणनिर्णयाची अंमलबजावनी करावी, तहसिलवर शुन्य शेतरस्ता केसेस ठेवाव्यात आदी मागण्यासाठी पारनेर तहसिलवर शेतकरी उपोषणास बसले आहेत. उपोषणकर्ते रामदास लोणकर, संजय साबळे,भाऊसाहेब वाळूंज, बबन गुंड,बबन मावळे, बसले असता बबन मावळे यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर ते उपचार घेवून पुन्हा येवून उपोषणास बसले त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती ढासळली.
 पुन्हा त्यांना रात्रभर हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आज सातव्या दिवशी संजय साबळे यांच्या पोटात दुखत असल्याने आरोग्य विभागाला संपर्क साधला असता त्यांनी व्यस्थ असल्याचे कारणे देत उपचारास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली असून पूर्णपणे तहसिल सर्व प्रशासकीय यंत्रणा  शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखे वागत आहेत, पोलिस यंत्रणा मात्र दिवस रात्र शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सात दिवस उभी आहे. त्यामुळे तहसिल प्रशासणा विरोधत शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असुन प्रशासणाच्या विरोधात संताप वाढत चालला असुन अंदोलनस्थळी पारनेर तालुक्यातील नागरिक भेटी घेवुन प्रशासनाचा निषेध व्यक्त करत आहे. 
       आता आंदोलनकर्त्यांचे  नातेवाईक त्याठिकाणी येवुन बसत आहेत व  न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. यावेळी गुलाब नवले, सखाराम भोसले, दत्तात्रय लोणकर, काशिनाथ लोणकर,दिलीप गाडे, सुरेश गाडे, रमेश बाखवकर,आकाश बाखकर,मच्छिंद्र साबळे, पाराजी वाळूंज, काशिनाथ लोणकर, दशरथ वाकूंज,अजितराव जगदाळे,दिलीप मते,अंजाबापू येणारे, संदिप मावळे, सचिन वाळूंज, विजू मावळे, आदिसंह नागरिकांनी आंदोलना दरम्यान भेटी दिल्या असून या आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे उद्या सकाळी ११.०० वा. तहसिल समोरील पारनेर रोड बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 पारनेरमध्ये सुरू झालेल्या शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचा सातवा दिवस असून पारनेर तहसिलच्या विरोधात प्रलंबित शेतरस्त्यांच्या केसेस प्रकरणा संदर्भात चळवळीच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली असता वरिष्ठांकडून तातडीने फोनवरून संपर्क साधत शेतकऱ्यांना न्याय देण्यासंदर्भात सुचना करण्यात आल्या. - शरद पवळे. शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !