जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
वस्त्रोद्योग विभाग भारत सरकार यांच्या वतीने दिल्ली येथे दि. 22 ते 29 फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी येथील रेशीम कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अशोक वडवळे यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व रेशीम विकास अधिकारी पी. एस. देशपांडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
भारत टेक्सो दिल्ली येथील कॉन्फरन्समध्ये विविध देशाचे प्रतिनिधी सहभागी होणार असून यामध्ये रेशीम शेतीचा शाश्वत विकास या विषयावर चर्चा होणार आहे. या परिषदेचे आयोजन वस्त्रोद्योग विभाग भारत सरकार आणि केंद्रीय रेशीम बोर्ड यांनी केलेले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा