maharashtra day, workers day, shivshahi news,

जिल्हा महिला व बाल विकास विभागाची त्रैमासिक कामकाज आढावा बैठक

जिल्हा बाल संरक्षण कक्षाची स्थापना
Establishment of District Child Protection Cell ,Quarterly performance review meeting , Hingoli , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 च्या कलम 106 नुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षाची स्थापना करण्यात आली असून अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज आढावा बैठक पार पडली.
अप्पर जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा बाल संरक्षण कक्षाचा कामकाजाचा आढावा, जिल्हा कृती दल, प्रायोजकत्व आणि प्रतिपालकत्व व बाल कल्याण समिती कामकाजाचा आढावा घेण्यात आला. जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत राबविलेले विविध जन जागृती कार्यक्रम, जिल्ह्यात ग्राम बाल संरक्षण समितीमध्ये बाल मित्र निवडीबाबत, कोविड काळात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या गृहभेटी, जिल्ह्यात थांबविलेल्या बाल विवाहाबाबत, काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांचे सामाजिक तपासणी अहवाल, पाठपुरावा, समुपदेशन, अनाथ बालकांना प्रमाणपत्र मिळाल्याबाबत, रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या शोध मोहिमेबाबत तसेच जिल्ह्यातील कोविड-19 मुळे एक पालक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची माहिती तसेच बाल कल्याण समिती यांच्या आदेशान्वये काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचा लाभ देण्याबाबात आढावा घेण्यात आला. 
बैठकीला सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, जिल्हा आरोग्य विभागाच्या डॉ. सुवर्णा महाले, जिल्हा न्यायिक सेवेचे श्री. खुपसे सर, जिल्हा कामगार अधिकारी एन. एन. भिसे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाचे आ. ना. वागजकर, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे महेश राऊत, महिला आर्थिक विकास महामंडळाचे रोशन अढाऊ, जिल्हा महिला व बाल विकास विभागातील सहाय्यक लेखाधिकारी श्रीमती कमल शातलवार, विधी सल्लागार - विद्या नागशेट्टीवार, बाल कल्याण समिती अध्यक्ष सुधाकर इंगोले, सदस्य परसराम हेंबाडे, श्रीमती किरण करडेकर, संगिता दुबे, बाल न्याय मंडळ सदस्या सत्यशीला तांगडे, वर्षा कुरील, प्रायोजकत्व आणि प्रतिपालकत्व समितीचे सदस्य चंद्रकांत पाईकराव, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीब खान पठाण, कायदा व परीविक्षा अधिकारी - अँड. अनुराधा पंडीत, सामाजिक कार्यकर्त्या रेशमा पठाण, रामप्रसाद मुडे, समुपदेशक सचिन पठाडे, अनिरुध्द घनसावंत चाईल हेल्पलाईनचे प्रकल्प समसन्वयक संदीप कोल्हे यावेळी उपस्थित होते.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !