पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची शहरात व तालुक्यात भेटी
नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील आठ केंद्रांवर आजपासून बारावीच्या परीक्षा चालू झाल्या असुन ४ हजार ४४४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षा आज पासून सुरू होत या साठी कडक पोलीस बंदोबस्त व बैठे पथक या मुळे परीक्षा सुरळीत पणे चालू झाल्या आहेत.पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची भेट.
परीक्षा कॉपीमुक्ती झाल्या पाहिजे यासाठी माध्यमनिहाय व विषयानुसार विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था बदलती ठेवण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली. प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था वेगळ्या ठिकाणी होईल. एक शाखा एक परीक्षा केंद्र बदलून प्रत्येक केंद्रावर कला, वाणिज्य, शास्त्र आणि किमान कौशल्य शाखेची बैठक व्यवस्था केली आहे. त्यामुळे कॉपीमुक्त, गैरमार्गाला आळा बसणार आहे.
तसेच कॉपीमुक्त परीक्षेसाठी बैठी पथकासह महसूल व गटविकास अधिकारी व शिक्षण विभागाचे प्रत्येकी एक पथक, जिल्ह्याचे दोन भरारी पथक त्याचबरोबर पोलिस यासह इतर खाते पथकांचीही नजर असणार आहे अशी माहिती गटशिक्षणाधिकारी नंदकिशोर काकडे यांनी दिली आहे.
आज पासून नायगावतालुक्यातील जनता कनिष्ठ महाविद्यालय नायगांव येथे ८९६ विद्यार्थी, यमुनाबाई कमवि. ५११, दत्त माध्यमिक ३९९, पो. बे. आ. शा., मरवाळी तांडा ६०२, जवाहरलाल नेहरू विद्यालय बरबडा ७४८, वि.ज. भ.जा., कुंटूर तांडा ७३४, साईबाबा कमवि, शंकरनगर ३१९, संत ज्ञानेश्वर विद्यालय धुप्पा येथे २३५ विद्यार्थी आठ परीक्षा केंद्रावर एकुण ४ हजार ४४४ परिक्षार्थी परीक्षा देणार आहेत. गटशिक्षणाधिकारी नंदकुमार काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षा केंद्र प्रमुख म्हणून एम.एन रिनगुटवार हे काम पाहत असून येथील परीक्षा केंद्रांवर नेमण्यात आलेल्या बैठे पथकात महसूल पथक, गटशिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी व फिरते पथक अशा चार पथकाच्या माध्यमातून पेपरला सुरुवात झाली असुन या परिसरात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावा यासाठी नायगाव, रामतीर्थ व कुंटुर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना कडक बंदोबस्तासाठी तैनात करण्यातआले आहे.
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या परीक्षा केंद्राला भेटीनायगाव शहर व तालुक्यातील परीक्षा केंद्राना पेपरच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी अभिजित राऊत व पोलीस अधीक्षक कृष्णाजी कोकाटे साहेब यांनी नायगाव शहरातील व तालुक्यातील मरवाळी तांडा व धुपा शकरंनगर, केंद्राना भेटी दिल्या.जिल्हाधिकारी यांच्या समवेत कालच रुजू झालेल्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड या होत्या.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा