वाहन अडवून केली होती २७ लाखांची लूट
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
देऊळगाव राजा तालुक्यातील धोत्रा नंदाई फाट्याजवळ वाहन अडवून २७ लाखांची रोकड लुटणाऱ्या दरोडेखोरांसह स्टील कंपनीतील आरोपी कामगाराला न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
या गुन्ह्यातील आरोपींना २० फेब्रुवारी रोजी दुपारी जालना येथे अटक करण्यात आली. कंपनीतील एका कामगाराने दरोडेखोरांना बोलेरो गाडीच्या डिझेल टाकीला जीपीएस
लोकेशन बसवून हा दरोडा घडवून आणला होता.
अटकेतील आरोपी कचरू श्रीकिसन पडूळ, विष्णू गोविंद बनकर, दारासिंग बाबुसिंग राजपूत (४६, मोरांडी मोहल्ला जुना जालना), सुनील शिवाजी धोत्रे व बहादूर सुख्खुप्रसाद पासवान यांना २१ फेब्रुवारी रोजी देऊळगाव राजा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा