देशी दारूच्या 60 बाटल्या आणि म्यॅकडल नंबर 1 विदेशी दारूच्या 20 बाटल्या असा एकूण 10,000/-रुपयाचा मुद्देमाल जप्त केला
शिवशाही वृत्तसेवा, भोकरदन जिल्हा प्रतिनिधी मजहर खाॅंन पठाण
आज दिनांक 21/02/2024 रोजी सपोनि चैनसिंग गुसिंगे यांना माहिती मिळाली की, धावडा ते अजिंठा जाणाऱ्या रोडवर हॉटेल शिवशाही येथे अवैध देशी आणि विदेशी दारूची विक्री करीत आहे अशी माहिती मिळाल्यावरून घटनास्थळी गेलो असता तिथे एक ईसम मिळून आला असता त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव पांडुरंग मधुकरगिरी गोसावी वय 30 वर्ष रा धावडा ता भोकरदन असे सांगितले.
त्यानंतर आम्ही सदर इस्माची आणि हॉटेल शिवशाही याची झडती घेतली असता त्याचे ताब्यात देशी दारूच्या 60 बाटल्या आणि म्यॅकडल नंबर 1 विदेशी दारूच्या 20 बाटल्या असा एकूण 10,000/-रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई सपोनि चैनसिंग गुसिंगे पोलीस अंमलदार प्रदीप सरडे, जीवन भालके, नितेश खरात,शिवाजी भगत यांनी केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा