परीक्षा केंद्रांवर झूम ॲप द्वारे करडी नजर
आज पार पडला 12 वी बोर्डाचा पहिला पेपर
शिवशाही वृत्तसेवा,सिंदखेडराजा जिल्हा प्रतिनिधी,
आजपासून 12 वी बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर झूम ॲप द्वारे करडी नजर ठेवली होती प्रत्येक परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सिंदखेड राजा तालुक्यात देखील नारायणराव नागरे महाविद्यालय दुसरबीड .जीवन विकास विद्यालय दुसरबीड, जिजामाता हायस्कूल सिंदखेड राजा, अशा बऱ्याच परीक्षा केंद्रांवर आज इंग्रजी भाषेचा पहिला पेपर पार पडला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा