विद्यार्थ्यांकरिता अभ्यास व्यवस्था, संगीत असलेली बहुउपयोगी यंत्र, सौर दिवे, विजरोधक यंत्रणा
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
येथील एनटीसी भागातील छत्रपती शिवाजी राजे उद्यान परिसरात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. शिवजन्मोत्सवानिमित्त उद्यान परिसरात उभारण्यात आलेल्या सौर ट्री चे लोकार्पण करण्यात आले.
एनटीसी येथील छत्रपती शिवाजी राजे उद्यानात बुधवार दि.२१ फेब्रुवारी रोजी शिव जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष ऍड.रमेश शिंदे, सचिव पवन जाधव, पालिकेच्या स्वच्छता अभियान कक्षाचे आशिष रणसिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला छत्रपती शिवरायांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले. यानंतर पालिकेच्या वतीने लोकसहभागातुन विकसित झालेल्या उद्यानात सौर ट्री ची उभारणी करण्यात आलेल्या झाडांचे लोकार्पण करण्यात आले. या बहुउपयोगी सौर ट्री मध्ये विद्यार्थ्यांकरिता अभ्यास व्यवस्था, संगीत असलेली बहुउपयोगी यंत्र, सौर दिवे, विजरोधक यंत्रणा, परिसरासाठी सिसिटीव्ही असे बहुउपयोगी दोन झाडे पालिकेच्या वतीने उभारण्यात आले आहेत.
या झाडांचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा सुमित भुमरे या बालकांने गाऊन उपस्थितांची मने जिकंली. या कार्यक्रमाला सिद्धीविनायक सोसायटीचे अध्यक्ष कल्याण देशमुख, संचालक संजय भुमरे, गजानन बांगर, गणेश गरड, प्राचार्य पवन सोळंके, नागनाथ लोखंडे यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा