रिलस्टार नांदेडची आत्या कल्पना खानसोळे यांची विशेष उपस्थिती
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड ,(जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कूंटुंरकर)
नुकत्याच संपन्न झालेल्या नायगाव शहरातील शाही तीर्थ मंगल कार्यालय येथे लखन मेकअप आर्टिस्टच्या वतीने नांदेड शहरातील सुप्रसिद्ध रील्स स्टार कल्पना खानसोळे उर्फ नांदेडची आत्या व आयोजक लखन गणपती ढगे मेकअप आर्टिस्ट यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थी महिलांचा सन्मान करण्यात आला आहे.
दिनांक 29 जानेवारी 2024 सोमवार रोजी नुकत्याच संपन्न झालेल्या लखन मेकअप आर्टिस्टच्या सेमिनार कार्यक्रम पार पडला असून यामध्ये नांदेडची आत्या म्हणून प्रसिद्ध असलेली स्टार कल्पना खानसोळे आणि उद्योजक लखन गणपती ढगे सावरखेडकर यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थी महिलांचा अनुभव प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
या सन्मानामध्ये स्वरांजली सुधाकर जोंधळे सुप्रिया प्रल्हाद चकली रोहिणी व्यंकट पाटील ज्योती बालाजी चलमेवार प्रणिता बालाजी मोरे माया काळेवार कोमल सुरेंद्र डुमणे सोनी माधवराव बंडेवार विनोद शेळके पांडुरंग नागोराव वानखेडे दिपाली वेंकट मोरेवार राजर्षी गोपाळ आवळे स्नेहल प्रशांत धुळे, अलका संजय जाधव स्वाती बुरुडे सांची सूर्यवंशी पूजा लोहगावे या महिला पुरुषांचा सहभाग होता.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा