शिबिरात ६० रक्तदात्यांनी केले रक्तदान
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
औंढा नागनाथ - अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य व श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज जगद्गुरु रामानंदचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम महाराष्ट्र यांच्या वतीने औंढानागनाथ शहरातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन ११ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरास आमदार संतोष बांगर यांनी भेट दिली.
या रक्तदान शिबिराचे आयोजन जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान नाणिजधाम रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात आले होते .या रक्तदान शिबिरास नागोराव बागल , रामराव कदम , रामचंद्र बागल , मंदाताई वरकडे , गंगाधर देवकते , प्रकाश कदम, सखाराम चौढीकर, बालाजी कदम , लिंबाजी धनवे, काशीराम पाटील , रणजीत कोकाटे, दिलीप कदम ,राजू कदम ,संजय वरकडे यांनी परिश्रम घेतले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा