प्रा. मानसिंग ताटे यांचे शिवव्यख्यान
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कूंटुंरकर
व्हॉईस ऑफ मीडिया तालुका पत्रकार संघाच्या वतीने सोमवार दि. 19 फेब्रुवारी शिवजन्मोत्सव सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त सुप्रसिद्ध व्याख्याते शिव श्री प्रा. मानसिंग ताटे याच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वराज्य संस्थापक कुळवाडी भुषण छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती निमित्त शहरातील गुरुकुल पब्लिक स्कूल कल्याण पटिल टिन काॅम्पलेक्स शेळगाव रोड नायगाव येथे सोमवार दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी ठिक 09:00 वाजता व्हॉईस ऑफ मीडिया तालुका पत्रकार संघ व माॅर्निंग ग्रुपच्या वतीने भव्य शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त परिसरातील सुप्रसिद्ध व्याख्याते शिव श्री. प्रा. मानसिंग ताटे शिवनीती व आजच्या माध्यमांची भुमिका या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे,
सदर कार्यक्रमास तालुक्यातील मान्यवरांसह मॉर्निंगवॉक ग्रुप व व्हॉईस ऑफ मीडियाचे सर्व तालुक्यातील पदाधिकारी आणि नायगाव शहर व तालुक्यातील बरबडा, कुंटूर, मांजरम, नरसी, येथील सर्वच पत्रकार बांधव यांची विशेष उपस्थिती असणार असल्याची माहीती व्हॉईस ऑफ मीडिया नायागांव तालुकाध्यक्ष नागेश पाटील कल्याण व व्हॉईस ऑफ मीडिया सर्व पदाधिकारी पत्रकार यांच्यावतीने देण्यात आली आहे....
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा