देव धर्मापेक्षा, मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा - कर्नल माणिक आल्हाट
शिवशाही वृत्तसेवा, पुणे (जिल्हा प्रतिनिधी अभिषेक जाधव)
फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या वतीने कोयाळी गावचे सुपुत्र कर्नल माणिक ज्ञानोबा आल्हाट यांचा भारतीय सैन्य दलात 36 वर्षाहून अधिक काळ देश सेवा केली सोबत अनेक पुरस्कार घेत आई-वडिलांच्या साक्षीने राष्ट्रपती यांचेकडून देखील ते सन्मानित झालेत.नुकतेच 26 जानेवारी 24 रोजी सेवा निवृत्त झालेत म्हणून त्यांना थोरसमाजसुधारक महात्मा फुले यांची फुले पगडी घालून दोघा पति पत्नीच्या आंघावर एकत्रित शाल पांघारून महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले फोटो फ्रेम ,फुले उपरणे देऊन दोघांचा एकत्रित सन्मान संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी केला.
तसेच कोयाळी ग्रामस्थांचे वतीने गावातून भव्य मिरवणूक काडून फटाकडेच्या आतिषबाजी व फुलांच्या वर्षावाने जंगी स्वागत केले.त्यानंतर श्री.भानोबा देवाच्या मंदिरात त्यांचे हस्ते आरती करून अहील्यारणी होळकर सभामंडपात अहिल्यादेवीं पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला. यावेळी सरपंच श्री.अजय टेगले, उपसरपंच श्री.बापू सरोदे, मेजर सत्यवान शिंदे, प्रा.वसंतराव गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच आसाम,अमरावती , जळगाव, बुलढाणा,सातारा ,नगर, इंदापूर पुणे परिसरातून त्यांचे आलेले मित्र आणि नोकरीतील सहकारी यांनी त्यांच्या कष्टमय काम करून घेतले शिक्षण , दुसऱ्यांना मदत कशी केली तसेच शिस्तप्रिय कामाची , देशसेवेचे अनेक उदाहरणे देत त्यांनी देशसेवा निस्सीम , मनलावून केल्याचे सांगितले.
यावेळी सत्यशोधक ढोक म्हणाले की 1980 ते 1985 ते श्री.शाहू मंदिर महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेऊन ते या कॉलेजकडून एन.सी .सी मधून दिल्ली येथे 26 जानेवारी परेड साठी (RD परेड) निवड झालेले कॉलेजचे पहिले विद्यार्थी होते. त्यांची खूपच गरिबीची परिस्थिती होती त्यांना त्यावेळी कै.उत्तमराव पाटील यांनी मेजर बटुळे सरांचे विनती वरून खूप आर्थिक मदत केली होती. त्यांना कॉलेज जीवनात एन.सी सी. मुळे सचोटीने , शिस्तप्रिय ,निष्ठेने काम, दुसऱ्यांना मदत करण्याची शिकवण मिळाल्याने त्यांचेकडून चांगली देशसेवा झाली हाच गुण नवीन पिढीने आत्मसात करून त्यांची प्रेरणा घेऊन सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करावी असे ढोक यांनी आवाहन केले.
सत्कारास उत्तर देताना कर्नल आल्हाट म्हणाले की मी तर देशसेवा केलीच सोबत तेवढीच आई वडिलांची बहिण,भावाची देखील मदत करीत निस्सीम सेवा केली, त्यामुळे अनेक संकटांवर मात करून योग्य प्रकारे देश सेवा करीत सेवा निवृत्त झालो म्हणून आज आपणा सर्वांकडून हा ग्रामस्थांचा व फुले एज्युकेशनचा सन्मान स्वीकारताना माझ्या आई वडिलांची पुण्याई म्हणून मला हे भाग्य लाभले असे देखील ते म्हणाले. आपल्याला देव धर्म पूजा पाठ करून जे पुण्य मिळत नाही ते पुण्य आई वडिलांची चांगली सेवा केल्याने लगेच भेटते असे सांगून कोणताही आर्थिक भ्रष्टाचार न करिता गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात आर्थिक मदत करा ती मुले नक्कीच पुढे जावून चांगली ñदेशसेवा करून समाजाचे व देशाचे नाव रोशन करतील असे सांगून देव धर्मापेक्षा खरी मानवसेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे देखील कर्नल म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खेड वारकरी संघटनेचे संचालक राजू आल्हाट यांनी केले तर कर्नल आल्हाट यांचा जीवन परिचय माजी सरपंच गोविंद दिघे यांनी करून दिला आणि इंदापूर चे डॉ.खामकर यांनी आभार मानले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा