राजकीय पक्षाचे पद देण्याच्या आमिष
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतिक सोनपसारे)
राजकीय पक्षाचे पद देण्याच्या बहाण्याने घेतले होते शेगावला बोलावून नंतर केले महिलेसोबत नको ते कृत्य फेसबुकवर ओळख झालेल्या अमरावती जिल्ह्यातील ३८ वर्षीय विवाहित महिलेस एका राजकीय पक्षाचे पद देण्याच्या बहाण्याने शेगांव येथील घरी बोलावून शित पेयात गुंगिचे औषध देवुन जबरदस्ती शारीरीक संबंध प्रस्थापित केल्याची घटना दि. १७/२/२०२४ रोजी सायंकाळी ८.१२ वा उघडकीस आली.सदर घटना अशा प्रकारे आहे की, यातील फिर्यादी ही विवाहीत असुन तीला दोन अपत्ये आहे.फेसबुकच्या माध्यमातून तिची आरोपीशी ओळख झाली आरोपी सदर महिलेस मी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे मी तुला पक्षात मोठे पद मिळुन देतो अशी वेळोवेळी बतावनी करायचा.
नंतर त्याने फिर्यादी महिलेची जवळीक साधुन आरोपी याने माझी आई आजारी आहे असे खोटे सांगुन त्याच्या राहत्या घरी बोलावून घेतले नंतर कोल्ड्रिंक पिण्यास देवुन त्यामध्ये गुंगीचे औषध टाकले व जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले व फोटो काढले. व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली त्याबाबत महिलेने शहर पोलीस स्टेशन गाठले पोलिसांनी आरोपी आशिष नारायण व्यास वय ३७ वर्ष रा.स्वामी विवेकानंद चौक शेगाव याचे विरुद्ध कलम ३७६ (२), ३२८,५०४,५०६ भा.दं.वी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा