घरातील दाग दागिने रक्कमसह संसार उपयोगी वस्तू जळुन चार लाखाचे नुकसान
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कूंटुंरकर
आदमपूर: बिलोली तालुक्यातील आटकळी तेथील डोबी नावाने परिचित असलेल्या शिवारात अटकळी येथील दिगांबर पारते या शेतकऱ्यांचे महावितरण कंपनीच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या वायर मध्ये शॉर्ट सर्किट होऊन अख्ख घर जळून खाक झाल्याने घरात असलेल्या दाग दागिने ६० हजार रक्कमसह संसार उपयोगी वस्तू व धान्य जळून तब्बल चार लाखाच्या वर नुकसान झाले आहे.
अटकळी येथील अल्पभूधारक शेतकरी असलेले दिगांबर शंकर पारते हे गेल्या अनेक वर्षापासून आपल्या कुटुंबासह शेतामध्ये घर बांधून राहत शेती करतात. शेतामध्ये इंधन विहीर असल्याने त्या इंधन विहिरीपासून त्यांनी अंधारात प्रकाश मिळावा म्हणून घरात विद्युत पुरवठा केला होता. विद्युत पुरवठा करण्यात आलेल्या वायरमध्ये ता. १४ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन घरात आग लागली. पाहता पाहता अगिने रुद्रावतार धारण केल्याने घरात असलेले दोन कपाट जळाले. त्यामधील असलेले आधार कार्ड सहित सर्व कागदपत्रे, नवीन व जुने कपडे, सोन्याचे नेकलेस, झुमके, मनी मंगळसूत्र, चांदीचे चैन, लहान बाळाचे वाळे व रोक रक्कम ६० हजार असे जवळपास अडीच लाख रुपयांचे दागिने व ६० हजार नगदी रक्कम जळून खाक झाली आहे.
त्यासोबतच संसार उपयोगी वस्तू व ज्वारी, गहू, तांदूळ, दाळी हे सर्व खाद्यपदार्थही जळून नष्ट झाल्याने जवळपास त्या विद्युत शॉट सर्किटमुळे अख्ख घर जळून तब्बल चार लाख रुपयांचे वर नुकसान झाले असल्याने त्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर पडले आहे. त्यामुळे त्या घरजळीत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे शासनाने नुकसानग्रस्त घराचा पंचनामा करून आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा