maharashtra day, workers day, shivshahi news,

हिंगोलीत महासंस्कृती महोत्सवाची रसिकांना मिळणार मेजवानी

रामलीला मैदानावर होणाऱ्या या महोत्सवात विविध कलेची रसिकांना अनुभूती मिळणार

Mahaculture Festival ,  Festival held at Ramlila Maidan , Hingoli , shivshahi news.


 शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली -  येथे गुरुवार पासून सुरू होणाऱ्या पाच दिवसीय महासंस्कृती मोहत्सवात विविध देशभक्तीपर , बहारदार संगीताची हिंगोलीतील रसिकांना मेजवानी मिळणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रथमच ‘महासंस्कृती महोत्सव’आयोजित करण्यात येत आहे. या महासंस्कृती महोत्सवाचे गुरुवार, २२ ते २६ फेब्रुवारी, पर्यंत रामलीला मैदान हिंगोली येथे दररोज सायंकाळी ६ वाजता आयोजन करण्यात आले आहे. या पाच दिवसीय सांस्कृतिक सोहळ्याचे उद्घाटन गुरुवार दि. २२ फेब्रुवारी, रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. 
या कार्यक्रमाला राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, यांच्यासह खा. हेमंत पाटील, आमदार  सतीश चव्हाण, विक्रम काळे, विप्लव बाजोरिया, प्रज्ञा सातव, तान्हाजी मुटकुळे,  राजू नवघरे, संतोष बांगर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात -अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगोली येथे या महोत्सवाचा प्रारंभ गुरुवार, दि. २२ फेब्रुवारी पासून होत आहे. 

 २२ ते २६ फेब्रुवारी दरम्यान हिंगोली येथील रामलीला मैदानावर होणाऱ्या या पाच दिवसीय महोत्सवात जल्लोष संस्कृती आणि देशभक्तीचा, सदाबहार संगीत रजनी, महाराष्ट्राचा लोकोत्सव, केशर केवडा व लख लख चंदेरी यासह स्थानिक कलाकारांच्या कलेची रसिकांना अनुभूती मिळणार आहे. यात गुरुवार, २२ फेब्रुवारी रोजी उद्घाटनाच्या दिवशी सायं. पाच वाजता हिंगोली येथील प्रथितयश कलावंताचे सादरीकरण होणार आहे. 

शुक्रवार,२३ फेब्रुवारी रोजी सांय. ५ वाजता हिंगोली येथील प्रथितयश कलावंताचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये प्रविण पांडे व त्यांची चमू शस्त्र प्रदर्शन व शिवकालीन नृत्य , सुनिता भिमराव रणवीर व त्यांची चमू भारुड, नारायण धोंगडे व त्यांची चमू जागरण गोंधळ, शेख जावेद चीस्ती व त्यांची चमू कव्वाली, हाफीज फहीम आजीज व त्यांची चमू मुशायरा ही कला सादर करणार आहेत.
 
शनिवार, दि २४ फेब्रुवारी रोजी
 येथील प्रथितयश कलावंताचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये बबन दिपके व त्यांची चमू छत्रपती शिवाजी महाराज गीत, चंद्रभान सोनार व चमू वाघ्या-मुरळी, पांडूरंग धोंगडे व चमू गोंधळ, गणपतराव इचलकर व चमू वासुदेव, अशोक इंगोले व त्यांची चमू स्वच्छता अभियान, केशव खटींग व त्यांची चमूची  काव्यसंमेलन ही मैफल काव्यरसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. तर रविवार, दि.२५ फेब्रुवारी  पांडूरंग पाबळे व चमू वाघ्या-मुरळी, शिवाजी राऊत व चमू जागरण गोंधळ घालणार असून, शेषराव कावरखे यांची चमू भीमगीते सादर करणार आहेत.
महासंस्कृती या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी सोमवार,२६ फेब्रुवारी रोजी  उत्तम इंगोले यांचा चमू पोवाडा, शांताबाई पाईकराव यांचा चमू सामाजिक प्रबोधन, रामराव जाधव यांचा चमू लेहंगी नृत्य (बंजारा पारंपारिक नृत्य), नामदेव दिपके यांचा चमू लेक वाचवा-लेक शिकवा, प्रकाश दांडेकर यांचा चमू मतदार जनजागृती, शंतनू पोले यांचा चमू 'कोरलाय शिवबा काळजावर' या विषयावर सादरीकरण करणार आहे. 
  याबरोबरच दि.२२ ते २६ फेब्रुवारी,  या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज सचित्र दालन व शस्त्र पद्रर्शन, राज्य संरक्षित स्मारके व गडकिल्ले यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यक्रम, प्रदर्शन तसेच वस्त्र संस्कृती दालन, हस्तकला वस्तू दालन, बचत गटांचे उत्पादन दालन, पर्यटनविषयक दालन उभारण्यात येणार आहेत. तसेच कुस्ती, रांगोळी स्पर्धाही घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. 
   कार्यक्रम सर्वांसाठी खुला

पाचही दिवसाचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे. प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कार्यक्रमस्थळी लवकर येऊन आपले आसन ग्रहण करावे व या महासंस्कृती महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !