छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
हिंगोली - तालुक्यातील बळसोंड ग्रामपंचायत हद्दीतील साक्षीनगर येथील आदर्श प्रि.प्रायमरी शाळेत सोमवारी (ता.१९)शिवजयंतीचे अवचित्य साधून प्राचार्य सुवर्णा रामपूरकर यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान करून शिवजयंती कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी शाळेतील शिक्षिका जयश्री बोरकर, किरण जाधव, रुपाली शुक्ला , मयूर रामपूरकर यांच्यासह परिसरातील नागरिक ,पालक आदींची उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा