उपस्थित मान्यवरांनी भगीरथ भालके यांचे केले तोंड भरून कौतुक
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
स्वर्गीय आमदार भारत भालके फाउंडेशनच्या वतीने पंढरपूर येथील रेल्वे मैदानावर राज्यस्तरीय भारत कृषी महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 23 ते 26 फेब्रुवारी अशा चार दिवस चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन आरोग्य मंत्री तानाजी सामंत यांच्या हस्ते झाले.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उद्घाटन समारंभाला उद्घाटन आरोग्य मंत्री तानाजी सावंत, सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, आमदार यशवंत माने, शेतकरी कामगार पक्षाचे बाबाराजे देशमुख, विठ्ठल हॉस्पिटलचे चेअरमन युवराज पाटील, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, भैरवनाथ उद्योग समूहाचे अनिल सावंत, राष्ट्रवादीचे गणेश पाटील आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
सुरुवातीला आमदार भारत भालके यांच्या प्रतिमेचे आणि श्री विठ्ठल प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे संयोजक भगीरथ भालके यांनी आपल्या प्रास्ताविकातून कृषी प्रदर्शनाचा हेतू विशद केला कैलासवासी आमदार भारत भालके कायम शेतकऱ्यांचा विचार केला आणि संपूर्ण हयात शेतकऱ्यांच्या हितासाठी खर्ची घातली त्यामुळे त्यांच्या विचारांचा पाईक म्हणून आपणही शेतकऱ्यांसाठी काम केले पाहिजे म्हणून हे कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे. असे भगीरथ माहिती यांनी सांगितले.
त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना भगीरथ भालके यांनी आयोजित केलेल्या या कृषी प्रदर्शनाचे कौतुक केले. ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना मार्गदर्शन केले तर सहकार्याने शुभेच्छा देतानाच काही प्रेमाचे सल्ले देखील दिले.
कार्यक्रमाचे उद्घाटक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या भाषणात नानांच्या आठवणींना उजाळा दिला नानांचे आणि माझे खूप चांगले संबंध होते आम्ही नेहमी भेटत होतो नानांना आपल्या मतदारसंघातील प्रश्नांची चांगली जाण होती त्यामुळे ते भेटल्यानंतर नेहमी ह्याच विषयावर बोलायचे. विठ्ठल कारखाना हा तर नानांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. त्यामुळे भगीरथ दादांनी आता एक पाऊल पुढे टाकावे सावंत कुटुंब पूर्णपणे भालके यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहील अशी काही दिली त्याचबरोबर मंचावर काही आमदार तर काही भावी आमदार उपस्थित आहेत असा उल्लेख करून भगीरथ भालके आणि बाबाराजे देशमुख यांच्या संभाव्य उमेदवारीचे देखील संकेत दिले.
आपल्या अध्यक्ष मनोगतात हरिभक्तिपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी देखील भगीरथ भालके यांना शुभेच्छा देऊन यापुढे काम करत राहा तुम्हाला यश नक्की मिळेल असे आशीर्वाद दिले.
उद्घाटन कार्यक्रमानंतर खिलार जनावरांचे प्रदर्शन व स्पर्धा आणि विविध कार्यक्रमाने कृषी प्रदर्शनाला सुरुवात झाली असून हे प्रदर्शन सव्वीस फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वर्गीय भारत नाना भालके फाउंडेशनच्या आणि विठ्ठल परिवाराच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा