आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य भरात ठिकठिकाणी आंदोलन
शिवशाही वृत्तसेवा , हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली सेनगाव राज्य रस्त्यावरील नर्सी नामदेव येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने ता.२४ रोजी दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य भरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.
राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला १० टक्के आरक्षण घोषित केले आहे मात्र हे आरक्षण मराठा समाजाला मान्य नसून सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्याची मागणी सरकारकडे लावून धरली असून मागणी मान्य करण्यासाठी सध्या ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.
त्याअनुषगाने मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी नर्सी नामदेव येथे ही शनिवारी ११ ते १ या वेळेत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी मराठा समाज बांधवांच्या वतीने विविध घोषणा देऊन राज्य सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.आंदोलन स्थळी नर्सी पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी आंदोलनात बैलगाडीसह , रमेश शिंदे केसापुर,बंडु मुटकुळे,भिकाजी कदम,बद्रीनाथ घोंगडे, दत्तराव मामा जाधव, कांतराव पवार पाटील, माधवराव पवार, बाबुराव पवार, गणेश पवार, सारंगधर पवार, गजानन डांगे,संतोष मुटकुळे, शेषराव घोंगडे,नागेश गायकवाड,दत्तराव जाधव गजानन डांगे,भागवत गाडे,सौरभ पवार,राहुल मोरे,मदन लोथे, देवराव शेळके,किसन टेकाळे,संदीप जाधव,गणेश गुगळे,केशव शिंदे ,हरी मोरे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा